सोलापूर : सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्यूटर, टेलिकम्युनिकेशन व होम अप्लायन्सेस वस्तूंचे भव्य प्रदर्शन “इलेक्ट्रो २०२०” चे आयोजन केले गेले आहे. दि. ५ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत सोलापूरच्या हरिभाई व नुमवि शाळेच्या मैदानावर यंदा हे प्रदर्शन आयोजित केले असल्याची माहिती सेडाचे अध्यक्ष ईश्वर मालू यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यंदा इलक्ट्रो प्रदर्शनाचे हायर हे मुख्य प्रायोजक असून लेहर्भर, टीसीएल, ग्रीन लाईन अप्लायन्सेस व संजय कॉम्प्युटर्स हे सह प्रायोजक आहेत . प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार दि. ५ फेब्रुवारी रोजी सायं. ५.०० वा. संदीप पाटील, हायर अप्लायन्सेस, यांच्या शुभहस्ते व निल भनुआ एमडी, बॉश इंडिया यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती इलेक्ट्रो चेअरमन शिवप्रकाश चव्हाण यांनी सांगितले.
प्रदर्शनाचे यंदाचे खास आकर्षण म्हणजे सुमारे ३०% स्टॉल्स् हे विशेषरित्या निर्मित वातानुकुलीत दालनात असणार आहे. भेट देणाऱ्या ग्राहकांना दररोज लकी ड्रॉ मध्ये विविध आकर्षक बक्षिसे दिली जातात. यंदाचे प्रदर्शन हे वैविध्यपूर्ण, नाविन्यपूर्ण आणि सुविधा असणार आहे.स्टॉलधारक आणि प्रेक्षकांसाठी विविध सोई उपलब्ध करण्यात येणार असुन यामध्ये खवैय्यासाठी फुड कोर्ट इ. सोयी असणार आहे.
या पत्रकार परीषदेस सेडाचे उपाध्यक्ष श्री. सूरजरतन धुत , सचिव आनंद येमुल, सह सचिव सुर्यकांत कुलकर्णी, खजिनदार भुषण भूतडा, सहसंचालक सुयोग कालाणी , गिरीष मुंदडा, शिरीष कोठावळे , विजय टेके, हरीष कुकरेजा व सुनिल भीजे तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष सतिश मालू, केतन शाह, आनंदराज दोशी, दिलीप राऊत, दिपक मुनोत, विपीन कुलकर्णी ,जितेंद्र राठी, कौशिक शाह ,खुशाल देढीया आदी उपस्थित होते.