जलजीवन मिशन मध्ये हालगर्जी पणा नको
सोलापूर – वैयक्तिक शौचालयाचे अनुदान वेळेत द्या. जलजीवन मिशन ची कामे तातडीने पुर्ण करा अशा कडक सुचना जिल्हा परिषदेचे सिईओ दिलीप स्वामी यांनी दिल्या.
जिल्हा परिषदेत आज तालुक्यातील सर्व गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता, शाखा अभियंता यांचे बैठकीचे आयोजन व्हीसी द्वारे करणेत आले होते. या व्हीसी साठी सिईओ यांचे निजी कक्षात उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, यांचे सह गटविकास अधिकारी व उप अभियंता प्रमुख उपस्थित होते.
सोलापूर जिल्हयात शौचालय बांधून तयार आहेत मात्र ग्रामसेवक अनुदानाचा प्रस्ताव वेळेत देत नसतील तर निलंबनाचे प्रस्ताव सादर करा. या ग्रामसेवक यांना या पुर्वी दोन नोटीस बजावणेत आले आहेत. तिसरी नोटीस द्या.दोन हजार शौचालयाचे प्रस्ताव पेडींग आहेत. तीन दिवसात अनुदान वितरीत करा. तालुका स्तरावर या साठी निधी करणेत आला आहे.
जलजीवन ची कामे तातडीने पुर्ण करा- सिईओ दिलीप स्वामी
गाव पातळी वरव लोकवर्गणी चे कामात हालगर्जी पणा करणारेंवर कारवाई करणे येणार आहे. जलजीवन मिशन काम वर्कआॅर्डर देऊन ही पुर्ण होत नसतील तर कारवाई प्रस्तावित करा. जी कामे सुरू झाली आहेत ती वेळेत पुर्ण करा. कामाचा दर्जा चांगला ठेवा. प्रत्येक स्टेज ला फोटो व व्हीडीओ जतन करून ठेवा.
नळकनेक्शन ची कामे एक महिन्यात पुर्ण करा. जे स्वच्छ भारत मिशन व जल जीवन मिशन च्या कामात हालगर्जीपणा करतील त्यांची विभागीय चौकशी प्रस्ताविक करणेचे सुचना उपसचिव यांनी दिले आहेत. या मध्ये कुठल्याही प्रकारे हयगय चालणार नाही. जलजीवन मिशन योजना तुमची आहे. त्यात गावाचे हित आहे. पिण्याचे पाण्यासाठी तरी नियोजन करा. पुण्य वाटून घ्या असे भावनिक आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले.
जलजीवन लोकवर्गणी चे काम खुप कमी आहे. या साठी नेमणेत आलेल्या संस्थांचे मुल्यमापन करणेत येणार आहे. सरपंच व ग्रामसेवक यांनी जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन साठी १५ वा वित्त आयोग राखून ठेवणेत आला आहे. ६० टक्के खर्च करणेची जबाबदारी ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांची राहिल. विस्तार अधिकारी यांनी जबाबदारी द्या. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितलें.
उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कामे वेळेत पुर्ण करा. या बाबत जिल्हा स्तरीय कार्यशाळा घेऊन सुचना दिले आहेत. अद्यार डीपीआर तयार न करणारे ग्रामसेवक यांची लिस्ट तयार करणेत येत आहेत. निधी वेळेत खर्च झाला नाही तर जबाबदारी निश्चित करणेत येईल.
कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांनी परखड शब्दात शाखा अभियंता यांची कानउघाडणी केली. कामे वेळेत पुर्ण करणे साठी फिल्डवर जा. अशा सुचना दिल्या. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन ची कामांचे कार्यारंभ आदेश देऊन काम सुरू न करणारे वर्क आॅर्डर रद्द करणार असल्याचे सांगितले.
कारवाई चे प्रस्ताव सादर करा – उप मुकाअ शेळकंदे
……………..
लाभार्थ्यांना अनुदाना पासून वंचित ठेवणारे ग्रामसेवक यांनी या पुर्वी दोन नोटीस दिले आहेत. तरीही फरक पडत नसेल तर निलंबनाचे प्रस्ताव पाठवा अशा स्पष्ट सुचना उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी दिल्या.