सोलापूर : सोलापुरातील प्रभाग २२ मध्ये होणारा विस्कळित पाणीपुरवठा, दूषित पाणी पुरवठा या संदर्भात येणाऱ्या नागरिकांनी आज महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समोर समस्या मांडली. या भागातील ही समस्या लवकरच सोडविली जाईल अशी ग्वाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवेक्षक विपत झोन क्रं. सातचे अवेक्षक भोसले व एजाज शेख, झोन क्रं. सहाचे अवेक्षक गायधनकर, संजय कोळी, इलाही शेख, चावी वाले फुलारी, कांबळे यानी आज रामवाडी परिसरातील रामवाडी रिक्षा स्टॉप ते अंबाबाई मंदिर, रामवाडी पारसी बंगला, पोगूल माळा या सर्व ठिकाणी पाहणी केली. माजी नगरसेवक किसन जाधव यावेळी उपस्थित होते. नागरिकांनी माजी नगरसेवक जाधव यांच्या समोर गाऱ्हाणे मांडले. या भागातील नागरिकांना भेडसावत असलेल्या पाण्याच्या समस्येबाबत माजी नगरसेवक किसन जाधव व माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांनी महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले, पाणी पुरवठा अधिकारी विजय राठोड, व्यंकटेश चौबे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. आजच्या पाहणीनंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या भागातील समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड, ज्ञानेश्वर जाधव, तोडदार, अशोक जाधव, नागेश जाधव, अनिश जाधव, फिरोज शेख, वसंत कांबळे, चंदा जाधव, चंदा स्वामी, स्वाती जाधव यांच्यासह प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.