स्वयंचलित मशिन करतायेत मालिश सेवा सिईओ स्वामी यांनी केले अभिंनदन ..!
सोलापूर – विविध संताच्या पालख्यांचे आगमन सोलापूर जिल्ह्सात होत आहे. या पार्श्वभुमीवर सोलापूर जिल्हा परिषदेने वारकरी बांधवांसाठी खास मसाज सेवा दिलेमुळे वृध्द वारकरी बांधवांच्या आनंदाला पारवार उरला नाही.
जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात देवळाला व रावगाव ग्रामपंचायतीने शेकडो किलोमीटर पायी प्रवास करून आलेल्या वारकरी बांधवांसाठी खास मालीश करणारे लोक पाचारण करून त्यांचे कडून वारकरी यांचे पायाची मालीश करून चालून चालून आलेला थकवा दूर करीत आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे मार्गदर्शनाखाली “ वारकरी सेवा” मोहिम राबविणेत येत आहेत. उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी वारकरी यांचे साठी मालिश सेवा उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. ग्रामपंचायतींना यास चांगला प्रतिसाद दिला आहे. करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी ही “वारकरी सेवा” मोहिम प्रभावी पणे राबविली आहे. डोळ्यात प्राण आणू विठुरायाची ओढ लागलेल्या वारकरी बांधवांना या सेवेमुळे आराम मिळत आहे. नाशिक येथे संत त्र्यंबकेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आला आहे.
देवळाली चे सरपंच गहिनीनाथ गणेशकर, ग्राम विकास अधिकारी एक एम नागरसे यांनी चांगले नियोजन केलेमुळे वारकरी खुश आहेत. सिईओ दिलीप स्वामी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी गटविकास अधिकारी मनोज राऊत, ग्रामपंचायतीचे सरपंच गणेशकर व ग्रामविकास अधिकारी नागरसे यांचे या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले आहे.
स्वयंचलित मशिन करतायेत मालिश सेवा
…………..
देवळाली येथे आज संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करणेत आले. या प्रसंगी वारकरी यांच्या साठी सुरू करणेत आलेल्या स्वयंचलित मसाज सेवा उपक्रमांचा शुभारंभ अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर यांचे प्रमुख उपस्थितीत करणेत आला. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, गटविकास अधिकारी मनोज राऊत उपस्थित होते. या प्रसंगी जेसीबी चे बकेच मधून वारकरी बांधवावर पुष्पवृष्ट्री करणेत आली. ग्रामस्थांनी उस्फुर्तपणे भाविकांचे स्वागत केले. वारकरी यांचे साठी खाजगी शौचालये उपलब्ध करून देणेत आली असून स्नानाची व पिण्याचे थंड पाण्याची सोय करणेत आली आहे.
भाविक मालिश सेवेमुळे तृप्त ..!
………………
वरून कडाक्याचे उन्ह अशा स्थितीत चालून चालून थकलेले पाय जेंव्हा ग्रामपंचायतीने सुरू केले विसावा केंद्रात येऊन विसावतात तेंव्हा त्याना चांगला आराम मिळावा म्हणून झेंडू बाम व आयुर्वेदिक तेल लावून भाविकांच्या पायाची मालिश केली जाते. तेल लावून पायाला मालीश केलेमुळे वारकरी बांधवांना आराम मिळत आहेत. मालीशमुळे आराम मिळाले मुळे जिल्हा परिषद प्रशासनास वारकरी दुवा देत आहेत.
या साठी मंडप टाकून कक्ष करणेत आला आहे. परिसरातील मालीश करंणारे पाच लोक बोलविणेत आले आहेत.
वृध्दांसाठी विसावा करणेत आला आहे.
महिला वारकरी यांचे साठी खास हिरकणी कक्ष केला आहे.देवळाली चे सरपंच गहिनीनाथ गणेशकर, ग्राम विकास अधिकारी एक एम नागरसे यांनी चांगले नियोजन केलेमुळे वारकरी खुश आहेत.