सोलापूर : माघवारीनिमित्त सोलापूर शहरातील 43 दिंड्या व परिसरातील इतर मिळून 95 दिंड्यांच्या माध्यमातून यंदा ही माघवारी पालखी प्रस्थान व भव्य गोल रिंगण सोहळा केला जाणार आहे.
॥ पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे ॥ या उक्तीप्रमाणे वारकरी अधिकाराने अतिउच्च असून सुद्धा तो सर्वांबरोबर सामान्याप्रमाणे दिंडीमध्ये पायी चालत पंढरीला जाते. शुक्रवार दि.31/01/2020 रोजी दुपारी 3.00 वा. श्री मार्कंडेय मंदिर लक्ष्मी मार्केट सोलापूर येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पूजन ह.भ.प.लक्ष्मण महाराज चव्हाण, महेश जाधव यांच्या हस्ते व जगद्गुरू तुकाराम महाराज पालखीचे पूजन नागनाथ पाटील, सुभाष शिंदे महाराज, सुमंत शेळके यांच्या हस्ते केले जाणार आहे. तसेच श्री मार्कंडेय मुनींची आरती अरूण अवताडे, दगडू डोंगरे, रमेश शिंदे यांच्याकडून केली जाणार आहे. वारकरी प्रथेप्रमाणे नैमितिक भजनानंतर उपस्थित प्रत्येक दिंडीचा सन्मान पद्मशाली ज्ञाती संस्थेतर्ङ्गे केले जाणार आहे. तद्नंतर हा पालखी सोहळा दु.4.30 वा. नॉर्थकोट मैदानावर आल्यानंतर पाऊल ङ्गुगडी वगैरे खेळ खेळले जातील. जिल्हाध्यक्ष ह.भ.प.ज्योतीराम चांगभले, जिल्हा उपाध्यक्ष बंडोपंत कुलकर्णी, शहराध्यक्ष संजय पवार यांच्या मार्गदर्शनाने वारकरी पाऊल घेतले जातील. भव्य दिव्य असे गोल रिंगण, जिल्हा सचिव ह.भ.प.बळीराम जांभळे, कुमार गायकवाड, तानाजी बेलेराव, किसन कापसे यांच्याकडून लावून घेतले जाईल. या मैदानावर महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेवक शिवानंद पाटील, भाऊसाहेब लामकाने, ह.भ.प.गुरूदास तोडमे गुरूजी यांच्या हस्ते अश्वाचे व पालखीचे पूजन होऊन रिंगण सोहळ्यास प्रारंभ होणार आहे.
पाहे पा ध्वजेचे चिरगूट । राया जातन करीता कष्ट ॥ या उक्तीप्रमाणे ध्वजेधारी वारकरी रिंगण सोहळा पुर्ण करतील. त्यानंतर तुळशी वृंदावनधारी महिला व पखवाज वादकांचे रिंगण होऊन विनकरी महाराजांचे रिंगण होईल. शेवटी अश्वाचे रिंगण होऊन पालखी श्री महादेव मंदिर, साठे चाळ, सोलापूर येथे समारोपाला निघेल. समारोपाप्रसंगी पालखीची आरती नगरसेवक आनंद चंदनशिवे, हरिभाऊ शिंदे महाराज, प्रताप चव्हाण यांच्या शुभहस्ते होऊन समारोप केला जाणार आहे. या रिंगण सोहळ्यासाठी 1 लाख भाविक उपस्थित राहतील असे नियोजन अखिल भारतीय वारकरी मंडळाकडून करण्यात आले आहे, असे प्रदेशाध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या पत्रकार परिषदेला जिल्हा अध्यक्ष ज्योतीराम चांगभले,पालखी सोहळा अध्यक्ष महेश जाधव,जिल्हा सचिव बळीराम जांभळे,शहराध्यक्ष संजय पवार,नागनाथ पाटील,सुमंत शेळके, तानाजी बेलेराव,आदी उपस्थित होते.