येस न्युज मराठी नेटवर्क : जागतिक योग दिनानिमित्त योग प्रशिक्षक डॉक्टर सूर्यकांत धाप्पाधुळे यांच्या "सूर्या योगा क्लासेस" तर्फे दिनांक २१ ते २३ जून रोजी तीन दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अवंती नगर येथील माईंड हॉस्पिटल ,जुना पुना नाका, सोलापूर येथे सकाळी सहा ते आठ या वेळेत हे शिबिर संपन्न होणार आहे. यासाठी मोफत प्रवेश दिला जाईल मात्र नाव नोंदणी करणे बंधनकारक राहील.
आजच्या धकाधकीच्या व ताणतणावाच्या जीवनशैलीमध्ये शारीरिक फिटनेस सोबत मानसिक संतुलन राखणे ही काळाची गरज बनली आहे. रक्तदाब मधुमेह लठ्ठपणा या चुकीच्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या आजारांपासून दूर राहण्यासाठी दैनंदिन जीवनात योगाभ्यासाची गरज आहे. जागतिक पातळीवर देखील योगाचे महत्त्व वाढले असून आयुर्वेदाचार्य डॉक्टर सूर्यकांत धप्पाधुळे यांनी योगाभ्यास करून त्यातील पदवी संपादन करीत स्वतःला पूर्णपणे बदलले आहे. त्या पद्धतीने समाजातील विविध गटातील व्यक्तींना याचा फायदा व्हावा यासाठी नियमित योगा क्लास घेण्याचा संकल्प केला आहे. त्याला सोलापुरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद ही दिला आहे.
हजारो वर्षांपूर्वी भारतीय संस्कृतीने दिलेला हा अनमोल ठेवा जतन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन योग शिक्षक डॉक्टर धाप्पाधुळे यांनी केले.