सोलापूर : न्यायालयाच्या आदेशानुसार बेकायदेशीर चिमणी पाडली तरीही आमदार खासदार आणि भाजपनेच ही चिमणी पाडली असा आरोप कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज कागदी करत आहेत. शिवाय दोन वर्ष कारखाना सुरू होणार नाही अशी भावनिक साद घालत आहेत. तापलेल्या या तव्यावर आपली पोळी भाजून घेण्यासाठी भाजप विरोधक काडादी यांना सहानुभूती दाखवत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे यांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी काडादी यांच्या गंगा निवासस्थानावर भेट घेण्यासाठी गर्दी केली आहे. काहीजण त्यांना पक्षात प्रवेश करण्याची मागणी करू लागले आहेत आपण सर्वजण मिळून भाजपला इंगा दाखवू अशी भाषा देखील ऐकायला मिळत आहे. त्यामुळे चिमणी पडली आता यावर कलगीतुरा रंगू लागला आहे. बेकायदेशीर चिमणीच्या बाजूने असणारे सर्वजण सोलापूर विमानसेवेचे आणि सोलापूरच्या विकासाची विरोधक आहेत का असा सवाल संजय थोबडे यांनी केला आहे