• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सक्षमीकरणाकरिता संवाद कौशल्य महत्वाचा – मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी

Yes News Marathi by Yes News Marathi
June 14, 2023
in इतर घडामोडी
0
ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सक्षमीकरणाकरिता संवाद कौशल्य महत्वाचा – मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी
0
SHARES
0
VIEWS

आरोग्य सहाय्यिका यांचे संवाद कौशल्य व व्यक्तीमत्व विकास कार्यशाळेत मार्गदर्शन

सोलापूर -ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा दर्जा वाढविण्यासाठी व तत्परतेने सेवा देणे क‍िरिता वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचा ग्रामीण जनतेशी सुसंवाद वाढण्याची गरज लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सोनिया बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य सहाय्यिका यांचे संवाद कौशल्य व व्यक्तीमत्व विकास कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज आयोजित करण्यात आली होती.या कार्यशाळेत सध्याचे ताणतणाव व संवाद कौशल्यावर आधारित विषयांवर मार्गदर्शन केले. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. धन्वंतरी पूजनानंतर धन्वंतरी स्तवनाचे गायन करण्यात आले. मान्यवरांच्या स्वागतानंतर कार्यशाळेस सुरूवात करण्यात आली.

     यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना सीईओ स्वामी म्हणाले की या उपक्रमासाठी शासनस्तरावरून किंवा वरिष्ठ स्तरावरून आदेश नाहीत तरी  आपल्या जिल्ह्यातील आरोग्य सेवा दर्जेदार व्हावी, तत्परतेने रुग्णांस निस्वार्थी भावनेने सेवा देणेकरिता वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यात सुसंवाद वाढावा यासाठी  हा  एक प्रयत्न. आरोग्य सेवा देताना रुग्णांच्या भावनांना प्रतिसाद  द्या , त्यांचे ऐकून घ्या. ग्रामस्थ आणि तुमच्यातील सुसंवाद वाढला तर विश्वास निर्माण होईल. आपले शासकीय कर्तव्य पार पाडताना स्वतःकडे व स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. सशक्त शरीरात एक सशक्त मन राहतं आणि सशक्त मनाने तुम्ही येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाल. जनतेबरोबरच, आपले सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांशीही सुसंवाद वाढावा. आरोग्य सेवेविषयी ज्या काही तक्रारी प्राप्त होतात ,त्यातील बहुतेक तक्रारी विसंवादामुळेच निर्माण झाल्या असल्याचे निदर्शनास आले आहे. जे आवश्यक आहे तेवढंच बोला, बोलण्याची पद्धत साधी व सौम्य ठेवा.

      येणाऱ्या आषाढी वारीमध्ये महिला वारक-यांची संख्या अधिकची असण्याची शक्यता असल्याने त्यांना निसंकोचपणे शुश्रूषा सेवा मिळावी म्हणून या वर्षी महिला वारकर्यांकरिता महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा देण्यात येणार आहेत. येणाऱ्या वारीमध्ये वारकऱ्यांना आरोग्य सेवा देताना विठ्ठलाची सेवा करण्याचे भाग्य आपणांस मिळाले आहे या भावनेतून काम करा, याकडे काम म्हणून न पाहता सेवा म्हणून पहा. स्वतःच्या आंतरिक समाधानासाठी व कर्तव्य म्हणून काम करत रहा, म्हणजे कामाचे ओझे वाटणार नाही. ते पुढे म्हणाले की प्रत्येक युगात स्त्री शक्तीला एक मानाचे स्थान आहे. स्त्री जन्माचे स्वागत, माता मृत्यू ,बाल मृत्यू रोखणेकरिता आपले प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध  कार्यक्रमाबरोबर आपली वाणी प्रेमळ ठेवावी. संवाद कौशल्य व व्यक्तीमत्व विकास या विषयावर बोलताना व्याख्याते डॉ.अतिश बोराडे यांनी आरोग्य सहाय्यिकांचे दैनदिन जीवनातील ताणतणाव दूर करणेबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे म्हणाले की, आरोग्य सहाय्यिकांचा जॉब चार्ट पाहिला तर असे जाणवले की समाजात या संवर्गाला फार मोठी सेवा करण्याची संधी मिळाली आहे. विविध जाती-धर्म, मानसिकता, डोक्यात वेगवेगळे समज गैरसमज, श्रद्धा-अंधश्रद्धा डोक्यात घेऊन आलेल्या मंडळींना तुम्हाला सामोरे जावे लागते. या सर्वांशी सुसंवाद साधनं म्हणजे दिव्य आहे. यासाठी ध्यानधारणा व व्यायामाकडे लक्ष द्या. यासाठी स्वतःशीच अगोदर संवाद साधा. स्वतःशी संवाद साधता आला तरच तुम्ही इतरांशी संवाद साधू शकता. आरोग्य सहाय्यिकांचे महत्वाचे काम म्हणजे उपकेंद्र स्तरावरील आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यात दुवा साधणे. नवनियुक्त कर्मचाऱ्यांना समजून घेवून त्यांना आरोग्य सेवेविषयी मार्गदर्शन करणे. महत्वाचे म्हणजे मुलींच्या जन्माचा टक्का न वाढण्यामागे लोकांशी संवाद साधण्यात आपण कमी पडतो हेच कारण आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षमीकरण, सादरीकरण व बौद्धिक खेळ यावर जिल्हा आयुष अधिकारी डॉ. विलास सरवदे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे यांनी केले .याप्रसंगी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित होते, तर सुत्रसंचलन डॉ विलास सरवदे यांनी केले तर आभार प्रदर्शन वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशिक्षण पथक डॉ. संगीता सोनवणे यांनी मानले.

Previous Post

क्रिती सेनॉन उर्फ ​​देवी सीता तिचा बेज अनारकली सूटमधील खूबसूरत लुक इंटरनेटवर शेअर करते

Next Post

सोलापूर ग्रामीणअंतर्गत 7 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मनाई आदेश

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
सोलापूर ग्रामीणअंतर्गत 7 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मनाई आदेश

सोलापूर ग्रामीणअंतर्गत 7 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मनाई आदेश

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026