सोलापूर : माहिती अधिकार महासंघ महाराष्ट्र राज्य, जिल्हा सोलापूर यांची मासिक मीटिंग व माहिती अधिकार प्रशिक्षण कार्यक्रम शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे आज पार पडला. सदर प्रशिक्षणात पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख व यशदा यांच्या मार्फत माहिती अधिकार नियुक्त प्रशिक्षक संजय किणीकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच सर्व कार्यकर्त्यांना माहिती अधिकार अधिनियम 2005 मार्गदर्शिका पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष योगेश सुळे, कार्याध्यक्ष अवीराज कोळी, जिल्हा सचिन जगदीश अळीमारे, जिल्हा संघटक श्रीकांत कोळी, दाते सर, ता. अध्यक्ष भारत साळुंके, हनुमंत बनसोडे तसेच प्रचार संघटक पंढरपूर तालुका शिवाजी पवार, स्वामी मॅडम तसेच जिल्हा व तालुका येथील पदाधिकारी भरपूर संख्येने उपस्थित होते.