सोलापूर- प्रिसिजन कंपनीने अगदी प्रारंभापासूनच पर्यावरण पूरक उत्पादन पद्धती अवलंबली आहे. कंपनीच्या चिंचोली प्लांटमध्ये ४५ एकरावरील हिरवागार निसर्ग हाच पर्यावरण प्रेमाची साक्ष देतो आहे.दिनांक ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कंपनीत ३ ते ९ जून दरम्यान पर्यावरण सप्ताह साजरा करण्यात आला.
या सप्ताहात विविध उपक्रम राबविण्यात आले. यात Beat plastic pollution (प्लास्टिक प्रदूषणावर मात करा) या थीमला घेऊन कंपनीमध्ये बॅनर लावणे, याच थीमला अनुसरून पोस्टर स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, वृक्षारोपण करणे, धोकादायक कचरा व्यवस्थापन याविषयात कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग आदी कार्यक्रमांचा समावेश होता. या स्पर्धेत भाग घेतलेल्या कर्मचाऱ्यांना आकर्षक बक्षिसे ही दिली जाणार आहेत. यावेळी कंपनीचे एचआर जनरल मॅनेजर राजकुमार काशीद, सेफ्टी मॅनेजर सुहास पाटील, सिद्धेश्वर चंदनशिवे, चिदानंद मुंदडगी, सत्यविजय बारस्कर, विष्णू साठे, सीमा देशमुख, पारितोष खेर, गिरीश देसाई, यु सी जैन, किर्ती बालगाम, कांचन साळवे यांसह सर्व वरिष्ठ व्यवस्थापक, विभाग प्रमुख उपस्थित होते.