माझी वसुंधरा अभियान 3.0 मध्ये मंद्रूप ग्रामपंचायतला राज्यात प्रथम पुरस्कार पुरस्कार मिळाला आहे. बक्षीस रक्कम रुपये एक कोटी पंचाहत्तर लाख(1.75कोटी) रुपये जाहीर झाले. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन यांचे वतीने माझी वसुंधरा अभियान 3.0 सन 2022=23मध्ये राज्यात राबविण्यात आले. सदर अभियान मध्ये 10हजार लोकसंख्या पेक्षा अधिक लोक संख्या असणाऱ्या ग्रामपंचायत विभाग मध्ये मंद्रूप ग्रामपंचायतला राज्यात प्रथम पुरस्कार पुरस्कार मिळाला आहे. पृथ्वी अग्नी वायू जल आणि आकाश या पंचतत्वावर आधारित विविध योजना आणि कार्यक्रम ग्रामपंचायत मंद्रूप यांनी उत्कृष्ठ पद्धतीने पार पाडले आहे. मंद्रूप ग्रामपंचायत ल मागील वर्षी दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते
या वर्षी पुन्हा एकदा नेटाने अभियान राबवून राज्यात पहिला क्रमांक प्राप्त केला आहे बक्षीस रक्कम रुपये एक कोटी पंचाहत्तर लाख(1.75) जाहीर झाले.
सदरचे पुरस्कार वितरण कार्यक्रम दिनांक 5 जून2023रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी जमशेद भाभा थियेटर मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते सदर पुरस्कार वितरण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले सदरच्या सोहळ्यासाठी मंद्रूप ग्रामपंचायात चे ग्रामविकास अधिकारी श्री नागेश जोडमोटे सरपंच सौ अनिता कोरे विस्तार अधिकारी कृषी सचिन चव्हाण, महेश रगटे ,माजी सभापती कृषी ,पशुसंवर्धन व दुग्ध शाळा समिती आप्पाराव कोरे उपसरपंच भगवान व्हणमने भाग्यश्री जोडमोटे यांनी उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारला कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,आमदार संजय गायकवाड, मार्टिन कॅन्सुलेट जनरल ऑफ स्विस
प्रधान सचिव प्रवीण दराडे उपस्थित होते.
सोलापूर मधील मंद्रूप ग्रामपंचायत पुरस्कार प्राप्ती मागे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी अति मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादिन शेळकंदे तसेच गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ नोडल अधिकारी सचिन चव्हाण इत्यादी चे मार्गदर्शन लाभले