सोलापूर : होनमुर्गी येथे विकासकामासाठी 6 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यापुढेही कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही. मागील पाच वर्षांमध्ये जे कामे केले आहे आणि जे काम झाले आहे त्या कामांना स्थगिती देण्याचे काम सध्याचे सरकार करत आहेत. त्यामुळे विकास कामांना वेग येताना दिसत नाही. मात्र मी आपल्या सहकार्याने मी योग्य त्या पद्धतीने निधी आणण्याचा प्रयत्न करुन तालुक्याचा विकास करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन माजी सहकारमंत्री तथा आ. सुभाष देशमुख यांनी केले.
होनमुर्गी (ता. द. सोलापूर) येथे विविध विकासकामाच्या भूमिपूजनाप्रसंगी आ. देशमुख बोलत होते. कार्यक्रमास उपसभापती रामप्पा चिवडशेट्टी, बाजार समिती संचालक आप्पासाहेब पाटील, लोकमंगल पतसंस्थेचे चेअरमन गुरण्णा तेली, हणमंत कुलकर्णी, भिमाशंकर नरसगोंडे, यतिन शहा, रावजी कापसे, गौरीशंकर मेंडगुदले, संगप्पा केरके, संगप्पा पाटील, लक्ष्मण पाटील, सुरेश बगले, विश्वनाथ हिरेमठ, कांतू पुजारी, कुतबु पटेल, कलंदर कादरी, सूर्यकांत मेंडगुदले, राजू कोळी, बसवराज हसापुरे, सिध्दार्थ हविनाळे, सिध्दाराम शेतसंदी आदी उपस्थित होते.
नागरिकत्व कायदा लोकांच्या हक्कासाठी
देशात नागरिकत्व कायद्यावरून विरोध समाजात द्वेष पसरवत आहेत. मात्र हा कायदा लोकांना त्यांचा हक्क देणारा आहे हिरावून घेणारा नाही. होनमुर्गी गावात हिंदू आणि मुस्लिम समाज मोठ्याप्रमाणात आहे. सर्व लोक गुण्यागोविंदाने आणि कोणत्याही प्रकारचा दुजाभाव न करता राहतात. गावकर्यांना कोणत्याही अफवांना बळी पडू नये, आपापसातील एकी कायम ठेवावी, असे आ.सुभाष देशमुख यांनी यावेळी सांगितले.