सोलापूर : पद्मशाली शिक्षण संस्था संचलित, कुचन प्रशालेचा इयत्ता दहावीचा निकाल 84.83% लागला आहे .277 विद्यार्थी परीक्षेत बसले . त्यापैकी 27 विद्यार्थी विशेष प्राविण्य, 79 विद्यार्थी प्रथम श्रेणी , 79 विद्यार्थी द्वितीय श्रेणी व 50 विद्यार्थी पास श्रेणी असे एकूण 235 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सुपेकर ऋतुराज प्रदीप यांनी 88.80 %गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर नारकर अनुषा अतुल व चिंचुरे मयुरेश मनोज यांनी 84.80% गुण मिळवून द्वितीय क्रमांक विभागून पटकावला चि. चरकोपल्ली मधुसूदन विठ्ठल याने ८४.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
तसेच तेलुगु माध्यमाचा निकाल 100 % लागला .तेलुगु माध्यमातून बोल्लू रचना रघू हिने 85.20% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर इंजेटी अर्पिता सुवर्णराजू हिने 82.00% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर दंडगळ नवीन नरसप्पा 79.40% गुण मिळवून तृतीय कमांक पटकावला.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ गड्डम, उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी , सचिव दशरथ गोप ,सहसचिवा संगीताताई इंदापूरे ,खजिनदार नागनाथ गंजी,शालेय समितीचे अध्यक्ष श्रीधर चिट्याल व सर्व विश्वस्तांनी अभिनंदन केले
प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर , उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले ,पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, प्रणिता सामल, मल्लिकार्जुन जोकारे तसेच इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक बसवराज हिटनळ्ळी ,राहुल ताटे, अश्विनी मैसूर , श्निवास चेरमन ,निर्मला शिंदे , शरद पोतदार ,बाळासाहेब गंभीरे व प्रतिभा इराबत्ती व सर्व विषय शिक्षकांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले