येस न्युज नेटवर्क : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने सोमवारी रोजी जीपीएस प्रणालीच्या सेवेमध्ये वाढ करण्यासाठी आधुनिक पिढीच्या आंतराळयानाचे प्रक्षेपण केले आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून जीएसएलव्ही एफ- 12 या रॉकेटमधून एनवीएस-1 या उपग्रहाने अंतराळात भरारी घेतली आहे. जी एस एल व्ही एफ 12 च्या माध्यमातून हे उपग्रह अंतराळात सोडण्यात आलं आहे. या उपग्रहाचं वजन दोन हजार 332 किलो इतकं आहे
माहितीनुसार, दोन हजारांपेक्षा अधिक वजन असणाऱ्या एनवीएस-01 या उपग्रहामुळे भारताची नेव्हिगेशन प्रणाली अधिक सक्षम होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच या उपग्रहाचे प्रक्षेपण यशस्वी झाल्याचं देखील सांगितलं जात आहे. एनवीएस-1 या प्रणालीमुळे भारताची नेव्हिगेशन प्रणाली अधिक सक्षम होणार आहे. तसेच हा उपग्रह सीमेवर लक्ष ठेवण्यास देखील मदत करणार आहे. या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे पाकिस्तान आणि चीनला योग्य तो निरोप नक्की मिळेल यात शंका नाही. या दोन्ही देशांकडून सीमेवर सतत काहीतरी कुरघोडी करण्यात येत आहेत.