हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स संघाने मुंबईचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स संघाने मुंबईचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. गुजरातने सलग दुसऱ्यावर्षी फायनलमध्ये प्रवेश केलाय. गतविजेते गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये २८ मे रोजी फायनलचा थरार रंगणार आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये गुजरात संघाने दमदार कामगिरी केली आहे. ऑरेंज आणि पर्पल कॅप गुजरातच्याच खेळाडूकडे आहे. सांघिक खेळाच्या बळावर गुजरातने फायनलमध्ये धडक मारली आहे.
क्वालिफायर २ मध्ये विजय –
२६ मे रोजी झालेल्या सामन्यात गुजरातने मुंबईचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. अमहदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअवर गुजरातने मुंबईचा दारुण पराभव केला. या सामन्यात शुभमन गिल याने शतकी खेळी केली. तर मोहित शर्मा याने पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला.