अभिजीत पाटलांनी केले मोठे शक्ती प्रदर्शन; सहकार शिरोमणी साठी 242 उमेदवारांनी 268 अर्ज दाखल केले
पंढरपूर : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची ऊस बिल शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली. कामगारांच्या पगारी दिल्या, ऊस तोडणी वाहतूकदारांची देणे दिली. त्याच पद्धतीने सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची सर्व देणी कामगाराची पगार ,उसाला चांगला दर देण्याचे काम आम्ही करू. विठ्ठल थोरला भाव असेल तर चंद्रभागा हा धाकटा भाऊ आहे. त्याच पद्धतीने विठ्ठल कारखान्याचे नेतृत्व चंद्रभागेचे नेतृत्व करेल असे म्हणत अभिजीत पाटील यांनी सर्वांच्या वतीने आपणच करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 242 इच्छुक उमेदवारांनी 268 अर्ज दाखल केले आहेत. अत्यंत चुरशीची ही निवडणूक मानली जात आहे. यापूर्वी कधीही सरकार शिरोमणीची निवडणूक एवढ्या चुरशीची झाली नव्हती. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर अभिजीत पाटील यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यामध्ये ही परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे मोठी चुरस पाहायला मिळत आहे.
ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना शब्द दिला होता, त्यानुसार मोळी टाकण्यापूर्वी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सर्व ऊस बिल शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली होती. तसेच चालू हंगामात गाळलेल्या सात लाख 26 हजार मॅट्रिक टन उसाचे बिल देखील शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. त्याच पद्धतीने सहकार शिरोमणीचे ऊस बिल देखील कारखाना सुरू करण्यापूर्वी शेतकऱ्यांना असल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले. आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अभिजीत पाटील गटाने मोठे शक्ती प्रदर्शन करत शिवाजी महाराज चौक ते प्रांत कार्यालय अशी भव्य रॅली काढली होती ये रॅलीमध्ये हजारो सभासद सहभागी झाले होते.