सोलापूर, (प्रतिनिधी):- सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी, कामगार, कष्टकरी, उद्योजक, महिला, तरूण यांच्या विकासासाठी बॅक ऑफ इंडियाकडून जिल्हा प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन बँक ऑफ इंडियाचे उपविभागिय व्यवस्थापक शैलेश चंद्र ओझा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. नव्याने आलेले सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे स्वागत यावेळी करण्यात आले. याप्रसंगी अग्रणी बॅकेचे व्यवस्थापक संतोष सोनवणे उपस्थित होते.
सोलापूर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो ती ओळख पुसणे आवश्यक आहे म्हणून सोलापूर जिल्ह्याचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ज्या ज्या योजना राबविल्या जातील त्याला बॅक ऑफ इंडियाचे सहकार्य राहील. असेही शैलेश चंद्र ओझा यांनी सांगितले. जिल्ह्याची अग्रणी बॅक म्हणून जिल्ह्याच्या विकासात मोलाचा वाटा उचलणार असल्याचे अग्रणी बॅकेचे व्यवस्थापक संतोष सोनवणे यांनी सांगितले. शासनाच्या योजना सर्वसामान्यापर्यत पोहोचवण्यासाठी त्या यशस्वी करण्यासाठी बॅकांचा मोठा सहभाग आवश्यक असतो त्याप्रमाणे बॅक ऑफ इंडियाने जी सकारात्मकता दाखवली त्यावरून जिल्ह्यात विकासाची गंगा नक्कीच वाहणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. आगामी काळात जिल्ह्याचा आर्थिकस्तर उंचावलेला दिसेल असेही ते म्हणाले