सोलापूर:”धान्याच्या दानातून मुलांमध्ये त्यांच्या संस्कारक्षम वयात सामाजिक जाणीव निर्माण होते. ही कौतुकाची बाब आहे. असे समाजोपयोगी उपक्रम या शाळेमध्ये घेतले जातात. हे अभिनंदनीय यातून सामाजिक मूल्ये मुलामध्ये रुजतात .” असे प्रतिपादन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ता गायकवाड यांनी केलं. ते संगमेश्वर पब्लिक स्कूलमध्ये ‘अन्नपूर्णा चळवळी’च्या माध्यमातून घेतलेल्या कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या उपस्थितीत शाळेतील चिमुकल्यांनी जमवलेले सात क्विंटल धान्य ‘आपल घर’ नळदुर्ग या संस्थेस सुपूर्त करण्यात आले. याप्रसंगी मंचावर ज्येष्ठ विधीज्ञ वि. गो. म्हेत्रस, अध्यक्ष धर्मराज काडादी, मोहन भूमकर, बाबुराव मैंदर्गिकर, नरेश ठाकूर, त्रिवेणी मुरलीधर, प्राचार्या गायत्री कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते
प्रारंभी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर प्राचार्य गायत्री कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केलं. त्यानंतर शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार झाला. सत्कारानंतर प्रातिनिधिक स्वरूपात आपलं घर नळदुर्ग ते प्रतिनिधी नरेश ठाकूर यांच्याकडे संपूर्ण धान्य सुपूर्त करण्यात आले. शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक करत आपली कृतज्ञता ठाकूर यांनी व्यक्त केली. ” शाळेच्या वतीने अशा उपक्रमातून सामाजिक भान जपले जाते. मुलांमध्ये सामाजिक जाणीव जागृती निर्माण करता येते.” असे धर्मराज काडादी यांनी आपल्या मनोगतात सांगितले. तत्पूर्वी कियान कुलकर्णी या विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी पब्लिक स्कूल मधील संगमेश्वर पब्लिक स्कूलचे उपप्राचार्य वादीराज कुलकर्णी, शोभा गोटे, प्री स्कुलच्या स्नेहल मडकी, सुनिशा किनगी,अश्विनी पवार, भाग्यश्री राठोड, ज्योती माने यांच्यासह विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. आरशी मणियार यांनी सूत्रसंचालन केले तर वैष्णवी देशपांडे यांनी सर्वांचे आभार मानले.