येस न्युज नेटवर्क : एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या मुंबईतील निवासस्थानी सीबीआयने छापे टाकले. सोबतच सीबीआयने आर्यन खान क्रूझ प्रकरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात त्यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने त्यांच्या मुंबई, दिल्ली, रांची आणि कानपूरमधील एकूण 29 ठिकाणी छापेमारी केली.
समीर वानखेडे यांच्यासह एनसीबीचे तत्कालीन अधीक्षक विश्व विजय सिंह, एनसीबीच्या मुंबई झोनल युनिटचे तत्कालीन गुप्तचर अधिकारी आशिष रंजन, के.पी. गोसावी (खाजगी व्यक्ती), सॅनविले डिसोझा (खाजगी व्यक्ती) आणि इतर अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “संबंधित अधिकार्यांनी, व्यक्ती/इतरांकडून अवाजवी फायदा मिळवण्यासाठी, इतरांसोबत गुन्हेगारी कट रचला आणि कथित आरोपींकडून लाचेच्या स्वरुपात अवाजवी फायदा मिळवला,” असा आरोप सीबीआयने केला आहे.