बारामतीकरांनी पहिल्यापासूनच सोलापूर वर वक्रदृष्टी ठेवली आहे. बारामतीकरांच्या मनात आल्याशिवाय इथे मंत्रीपद दिले जाणार नाही शिवाय इथली विमानसेवा होणार नाही आणि इथले सर्वच नेते बारामतीकरांना घाबरतात ही वस्तुस्थिती आहे. अशातच पवार कुटुंबीयांकडून इथल्या नेत्यांना डिवसण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. मध्यंतरी रोहित पवारांनी सोलापूर लोकसभा राष्ट्रवादी लढवू शकते असं तेल ओतून काँग्रेसची नाराजी ओढवून घेतली. कोण रोहित पवार मी ओळखत नाही अशी सडकून टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी करत रोहित पवारांना झिडकारले होते. आता पुन्हा रोहित पवार यांनी मोहिते पाटलावर टीका केली आहे त्यांचा आता जिल्ह्यात अस्तित्व दिसत नाही असे ते म्हणाले. बाराकरांकडून कडून जाणीवपूर्वक सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघासाठी इथल्या प्रमुख नेत्यांवर तोंडसुख घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकीत दिसतील.