मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरून सध्या वाद सुरू आहे. यादरम्यन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे कार्यकर्त्यांसोबत ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट पाहिला. यानंतर फडणवीसांनी माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली आहे. मुलींचं शोषण करण्याचं षडयंत्र केलं जातं आहे. धर्माचा दुरुपयोग केला जात आहे. या सगळ्या गोष्टी सत्यकथेच्या माध्यमातून बाहेर आल्या आहेत. हा सिनेमा पाहिल्यावर मी एकच गोष्ट म्हणेन की, जे लोकं या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला भरचौकात फाशी दिली पाहिजे असं बोलले त्यांच्या सडक्या मेंदूतल्या सडक्या विचारांना फाशी देण्याची वेळ आज आली आहे, मला वाटतं की हा सिनेमा स्टोरी सांगण्याकरिता नाही, तर जागृत करण्यासाठी आहे. यानंतर कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ नये म्हणून हा सिनेमा तयार झाला आहे. असं फडणवीस म्हणाले.