येस न्युज नेटवर्क : थरारक सामन्यात हैदराबादने राजस्थानचा चार विकेटने पराभव केला. राजस्थानने दिलेले २१५ धावांचे आव्हान हैदराबादने अखेरच्या चेंडूवर पूर्ण केले. या विजयासह हैदराबादने स्पर्धेतील आव्हान जिंवत ठेवलेय. अखेरच्या दोन षटकात हैदराबादने बाजी मारली. अखेरच्या षटकात हैद्राबादला १७ धावांची गरज होती.. चेंडू संदीप शर्माच्या हातात होता..फलंदाजीसाठी अब्दल समद मैदानात होते.. संदीप शर्माने वाईड यॉर्कर चेंडू फेकला.. अब्दुल समद याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला.. पण मकॉय याने झेल सोडला.. तर शेवटच्या दोन चेंडूत सहा धावांची गरज होती… मार्को यान्सन यालाही एकच धाव घेता आली. अखेरच्या चेंडूवर हैदाराबादला विजयासाठी पाच धावांची गरज होती. संदीप शर्माने चेंडू फेकला अन् अब्दुल समद याने हवेत जोरात मारला.. जो रुटने झेल घेतला..त्यानंतर राजस्थानच्या सपोर्टर आणि खेळाडूंनी जल्लोष केला.. पण पंचांनी हा चेंडू नो बॉल असल्याचे सांगितले. राजस्थानच्या खेळाडूंचा आनंद क्षणात मावळला… अखेरच्या चेंडूवर समदला चार धावांची गरज होती.. नो बॉल पडल्यामुळे संदीप शर्मा दबावात गेला.. अब्दुल समद याने याचाच फायदा घेत स्ट्रेटला षटकार लगावत हैदराबादला थरारक विजय मिळवून दिला…