वादाच्या भोवऱ्यात अडकलेला ‘द केरळ स्टोरी’ हा सिनेमा 5 मे 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा या सिनेमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ओपनिंग डेला बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर वीकेंडलादेखील या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. एकीकडे या सिनेमावर टीका होत असताना काही मंडळींना पात्र हा सिनेमा भावला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने १३ कोटी, दुसऱ्या दिवशी २१.२२ कोटी आणि तिसऱ्या दिवशी 16.50 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच रिलीजच्या तीन दिवसांत या सिनेमाने जवळपास ५० कोटींचा गल्ला जमवला आहे.