वर्षाला ४०० टँकर लागणाऱ्या सोलापुरात टँकरची संख्या ३०-४० वर आली. तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या या कामगिरीसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाकडून ‘सवोत्कृष्ट जिल्हाधिकारी’ म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यानंतर साधारणत: २०१२-१३ पासून सोलापूर जिल्हा टॅंकरमुक्त म्हणून ओळखला जातो. त्यांच्या कार्यकाळात टॅंकरमुक्त झालेल्या जिल्ह्यात आता यंदा माळशिरस तालुक्यातील काही गावांना पाणी पुरवठा करायला टॅंकर लागतील, अशी स्थिती आहे. दरम्यान, पाऊस लांबल्यास काही दिवसांसाठी सांगोला, मंगळवेढ्यासह इतर काही तालुक्यात देखील काही टॅंकर लागतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे याठिकाणी १० मेपासून टॅंकरद्वारे पाणी पोहचवण्यात येणार आहे