जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील कंडी भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले. शुक्रवारी माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, सैन्याला राजौरी सेक्टरच्या कांडी जंगलात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. विशिष्ट माहितीवरून संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली. शोध सुरू असताना दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले आणि चकमक सुरू झाली. लष्कराची मोहीम अजूनही सुरू आहे.
जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये शुक्रवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी प्रत्युत्तरादाखल स्फोटकांचा स्फोट केला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले तर चार जवान जखमी झाले. जखमी चार जवानांना उपचारासाठी उधमपूर येथील कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यातील तीन जवानांचा रुग्णालयात मृत्यू झाला.
रक्षा दलांनी परिसरात दहशतवाद्यांच्या गटाला घेरले आहे. सकाळी सुरू झालेली ही चकमक अजूनही सुरूच आहे. सुरक्षा दलांनी जबाबदारी घेतली आहे. या परिसरात 2 ते 3 दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला. सकाळपासून सुरू असलेली ही चकमक राजौरी जिल्ह्यातील बन्यारी डोंगराळ भागातील डोक भागात झाल्याची माहिती आहे.