सोलापूर : सोलापुरातील पत्रकारांसाठी उभारण्यात येत असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी नगर भूमापन अधिकारी म्हणून आपले यापुढेही कायम सहकार्य असेल, असे मनोगत नगर भूमापन अधिकारी किरण कांगणे यांनी व्यक्त केले.
पत्रकार भवन लगत साकारण्यात येत असलेल्या पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पासाठी सहकार्य केल्याबद्दल नगर भूमापन अधिकारी सोलापूर किरण अशोक कांगणे आणि सौ. प्रतिभा कांगणे यांचे सोलापूर श्रमिक पत्रकार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने आभारपत्र देऊन आभार मानण्यात आले.
याबाबत कांगणे म्हणाले, शहराच्या मध्यवर्ती भागातील, सात रस्ता परिसरात, पत्रकार भवन लगत, सिटी सर्व्हे नंबर २३२ या रहिवासी क्षेत्र राखीव २ एकर शासकीय भूखंडावर शहरातील पत्रकारासाठी गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येत आहे. समाजाच्या समस्या मांडण्यासाठी कायम अग्रेसर असलेल्या पत्रकारांना हक्काचे घरकुल मिळत आहे, याचा आपल्याला आनंद होत आहे. पत्रकारांच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी यापुढेही आपले कायम सहकार्य असेल, असेही कांगणे म्हणाले. याप्रसंगी सोलापूर श्रमिक पत्रकार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे मुख्य प्रवर्तक प्रशांत माने, पत्रकार प्रीतम पंडित, कॅमेरामन अनिल कांबळे आदि उपस्थित होते.
सोलापूर येथील प्रस्तावित उड्डाणपूल, व रेल्वे भूंसपादनाचे मोजणीचे कामही जलद गतीने करुन दिले. तसेच, शहरातील मिळकत पत्रिका व ऑनलाईन केले.
महानगर पालिकेचे ४० ते ५० वर्षापासून 3८ मिळकतपत्रिकेवर तांत्रिक अडचणीमुळे नोंदी नव्हते. जवळ जवळ ५०० कोटीचे मिळकतीवर, हितसंबंधित धारकांचे सुनावणी घेऊन श्री.कांगणे यांनी महानगरपालिका सोलापूरचे नावे लावून दिले.