सोलापूर : तिर्हे येथील सालाबादप्रमाणे यावर्षी श्री म्हसोबा देवस्थान यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात सांगता झाली. यावेळी मनोरंजनासाठी लावण्यखणी न करता यात्रा कमिटीतर्फे कुस्तीला पसंती देण्यात आली व या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक झाले.
आज छत्रपती शंभुराजे तालीम येथे पूजन करून आखड्याची सुरुवात झाली. या कुस्तीसाठी अनेक मल्ल हजर होते. शेवटची कुस्ती पैलवान विकास धोत्रे व पैलवान महेश यांची जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सुरवसे व भारत जाधव यांच्या हस्ते लावन्यात आली. आज मैदानाची सुरुवात लहान मुलांपासून ते राज्य लेवल कुस्ती मल्लांपर्यंत झाली. आज या मैदानात महाराष्ट्र केसरी पैलवान समाधान घोडके महाराष्ट्र केसरी पै.नितीन खुर्द, पै.भरत निकाले, पै. दत्तात्रय लोणारकर यांनी विशेष हजेरी लावली. या आज ह्या निकाली कुस्ती आहे या 100 रुपये पासून शेवटची कुस्ती ही 51 हजार रुपयांची झाली. या कुस्तीसाठी बहुसंख्येने मल्ल व कुस्ती प्रेमी उपस्थित होते. या कुस्तीसाठी पंच म्हणून पैलवान शंकर जाधव, मेजर दिगंबर सोनटक्के, रामकाका जाधव, शिवाजी काशीद, श्रीरंग गवळी, प्रताप मल्लाव, वस्ताद महादेव सुरवसे होते. म्हसोबा यात्रा पंच कमिटी नवुदादा सुरवसे, हंसध्वज जाधव, शंकर जाधव, भास्कर बापु सुरवसे, किशोर जाधव, पार्थवीर बापू सुरवसे, यावेळी API आनंद थिटे व सरपंच नेताजी भारत सुरवसे यांच्या हस्ते विशेष कुस्ती लावण्यात आली.
यावेळी उपसरपंच मारुती लवटे, अजय सोनटक्के, गोवर्धन जगताप तसेच यात्रेसाठी पंच कमिटी व छत्रपती शंभुराजे तालीम संघाने कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.