सोलापूर : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, सोलापूर आणि एम. आय. टी. कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार, दि. २७ एप्रिल रोजी एम. आय. टी. कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च, बार्शी येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
पत्रकात म्हटले आहे, या रोजगार मेळाव्यासाठी सोलापूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद व औद्योगिक परिसरातील एकूण ११ पेक्षा जास्त नामांकित उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून एकूण २१०० पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत. ही सर्व रिक्त पदे किमान १० वी, १२ वी, पदवीधर, बी. ए., बी. कॉम., डिप्लोमा, इंजिनिअरिंग, बी. एस्सी. एम. एस्सी, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, आय.टी.आय, बी. फार्म, डी. फार्म, नर्सिंग, लॅब टेक्निशियन, पॅरामेडिकल, मॅकेनिक इत्यादी विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी असून, सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरीइच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
नोकरी इच्छुक उमेदवारांनी आपल्या कागदपत्रांसह दिनांक २७ एप्रिल २०२३ रोजी ठीक १० वाजता एम.आय.टी. कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च, बार्शी येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
काही अडचण आल्यास कार्यालयाच्या ०२१७- २९५०९५६ या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष भेटीद्वारे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट, पार्क चौक, सोलापुर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.