सोलापूर – – फास्टॅग नसलेल्यावाहनांनी पथकर नाक्यावरील फास्टॅग लेनवरप्रवेश केल्यास त्या वाहनधारकांकडून दुप्पटपथकर आकारला जाईल. उद्या दि. 14 जानेवारी पासून रोख रकमेव्दारे पथकर स्विकारण्यासाठी एकच लेन उपलब्ध करुनदेण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्गप्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली. त्याच बरोबर रोखीने पथकरदेणाऱ्या वाहनधारकांकडून दुप्पट पथकराचीआकारणी केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
संजय कदम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे माहिती दिली आहे की, भारतीयराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाव्दारे देशभरातीलसर्व टोल नाक्यावर इलेक्ट्रॉनिक्स प्रणालीव्दारेपथकर स्विकारण्यास सुरुवात केली आहे.यासाठी गाडीवर फास्टॅग लावणे बंधनकारकआहे. यापूर्वी यासाठी 15 डिसेंबर 2019 पर्यंतमुदत देण्यात आली होती. मात्र ती वाढवून 14जानेवारी 2020 पर्यंत करण्यात आली.रोखीनेपथकर स्विकारण्यासाठी पथकर नाक्यावरएकच लेन ठेवण्यात येणार आहे.
फास्टॅग साठी आवश्यक कागदपत्रे:-वाहनाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, वाहनधारकाचे पासपोर्ट आकाराचे फोटो, केवायसीसाठी लागणारे कागदपत्रे (ड्रायव्हिंगलायसन्स, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र,आधार कार्ड आणि पासपोर्ट)
सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातखालील ठिकाणी फास्टॅग उपलब्ध आहेत :- पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65वरील सावळेश्वर, वरवडे जिल्हा सोलापूरयेथील पथकर नाक्यावर, सोलापूर औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील तामलवाडी,येडशी व पारगांव जिल्हा उस्मानाबाद येथीलपथकर नाक्यावर उपलब्ध करुन देण्यातआलेले आहेत. वाहनधारकांना My FASTagॲपव्दारे फास्टॅग उपलब्ध करुन घेता येतील.एसबीआय,आयसीआयसीआय, एचडीएफसी,ॲक्सीस व इंडस् या बॅकेत विहित केलेल्याप्रक्रियेनुसार फास्टॅग उपलब्ध करुन घ्यावेत.तसेच ॲमेझॉन, पेटीएम ऑनलाईनसंकेतस्थळावर फास्टॅग उपलब्ध करुन देण्यातआल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गप्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली.