हनुमान जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र गौडगाव येथील दक्षिणमुखी मारुती मंदिरात जन्मोत्सवानिमित्त श्रींचा पाळणा व गुलाल कार्यक्रम मोठ्या भक्ती भावात साजरा दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती
अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील समर्थ रामदास स्वामी स्थापित दक्षिणमुखी जागृत मारुती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त भाविकांनी अलोट गर्दी केली होती. नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी ख्याती असलेल्या दक्षिणमुखी जागृत मारुतीच्या दर्शनासाठी आंध्र, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातील लाखो भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. दरम्यान हनुमान जयंती निमित्त गुरुवारी पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पहाटे चार वाजता श्रींना महारुद्राभिषेक, पहाटे पाच वाजता नवग्रह पूजा, गजलक्ष्मी पूजा, होम हवन,यज्ञ तसेच पहाटे सहा वाजता हनुमान जन्मोत्सवानिमित्त श्रींचा पाळणा व गुलाल कार्यक्रम मोठ्या भक्तीमय व मंगलमय वातावरणात शेकडो महिलांच्या उपस्थितीत पार पडला. भाविकांना दर्शनासाठी कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी मंदिर समितीच्या वतीने शिस्तबद्ध अशी दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली होती बोलो राम भक्त हनुमान की जयच्या घोषात अवघा परिसर भक्तीमय झाला होता. शारीरिक व मानसिक पिढा कमी व्हाव्यात, आर्थिक संकट दूर व्हावे, नोकरी मिळावी, संपत्ती प्राप्ती व्हावी, व्यापार भरभराटीस यावा, वाईट शक्तीपासून संरक्षण व्हावे म्हणून असंख्य भक्तगण श्रीक्षेत्र गौडगाव येथे मारुतीची उपासना करून फलप्राप्ती करून घेत असतात आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे मंदिराचे मुख्य पुजारी ज्ञानेश्वर फुलारी यांनी सांगितले दरम्यान हनुमान जन्मोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र गौडगाव येथे भक्तांनी श्री जागृत मारुती दर्शनासाठी भर उन्हामध्ये सुमारे दीड किलोमीटरहून अधिक रांगेत उभा राहून श्रींचे दर्शन घेतले हनुमान जयंती निमित्त मंदिर समितीच्या वतीने भक्तांसाठी दिवसभर महाप्रसादाची सोय करण्यात आली होती हजारो भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे, प्रकाश मेंथे, सिद्राम वाघमोडे, पीरप्पा पुजारी, अमसिध्द कोरे, भारत ननवरे, सेवक श्रीमंत सवळतोट, श्रीमंत मेत्रे, मल्लिनाथ पाटील, श्रीशैल कुंभार यांच्यासह मंदिराचे पदाधिकारी व सेवक आदींची उपस्थिती होती.