आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर केएल राहुल आता आयपीएल 2023 मध्येही फ्लॉप होताना दिसत आहे. चेन्नईविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या सामन्यात त्याला केवळ 20 धावा करता आल्या.
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल आयपीएल 2023 मध्ये फ्लॉप होताना दिसत आहे. 16व्या मोसमातील सलग दुसऱ्या सामन्यातही राहुलची बॅट काही खास कामगिरी करू शकली नाही. चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात केएल राहुल 18 चेंडूत केवळ 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. राहुलच्या या खेळीत दोन चौकारांचा समावेश होता. सलग दुसऱ्या सामन्यात राहुल खराब फॉर्ममध्ये दिसला.
केएल राहुलची आयपीएल ची सुरुवात चांगली झालेली नाही. इंडियन प्रीमियर लीग मध्ये लखनौ सुपर कर्णधार केएल राहुलने चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात केएल राहुलची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. राहुल गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्ममध्ये दिसत आहेत. याआधीच्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात त्याने 12 चेंडूत फक्त 8 धावा केल्या होत्या.
पहिल्या सामन्यातही चालली नाही बॅट
आयपीएल 2023 मध्ये लखनौ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पहिला सामना खेळला. हा सामना लखनौने 50 धावांनी जिंकला. पण, या सामन्यातही लखनौचा कर्णधार केएल राहुल पूर्णपणे फ्लॉप ठरला. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात राहुलला 12 चेंडूत केवळ 8 धावा करून तंबूत परतला.
चेन्नईचा लखनौवर 12 धावांनी विजय
अटतटीच्या लढतीत चेन्नईने लखनौचा 12 धावांनी पराभव केला. ऋतुराज गायकवाड याने अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर मोईन अली याने चार विकेट घेतल्या. चेन्नईने दिलेले 218 धावांचे आव्हानाचा पाठलाग करताना लखनौ संघाने 205 धावांपर्यंत मजल मारली. लखनौचा पराभव करत चेन्नईने आयपीएलच्या 16 व्या हंगमातील पहिला विजय नोंदवला.
लखनौच्या गोलंदाजांची धुलाई
रवि बिश्नोईचा अपवाद वगळता लखनौच्या इतर गोलंदाजांची धुलाई झाली. मार्क वूड, आवेश खान, क्रृणाल पांड्या, कृष्णप्पा गौतम, यश ठाकूर या सर्व गोलंदाजांची धुलाई झाली. आवेश खान याने एक विकेट घेतली. तर मार्क वूड याने तीन विकेट घेतल्या. पण चार षटकात 50 धावा खर्च केल्या.