येस न्युज मराठी नेटवर्क : स्पाईस एन आईस इव्हेंट्सच्या नवीन कॉर्पोरेट ऑफीसचे उद्घाटन 30 एप्रिल रोजी श्रीराम नवमी आणि गुरुपुष्यामृत या शुभमुहूर्तावर झाले. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी स्पाईस एन आईस इव्हेंट्स चे एम डी अनीश सहस्रबुद्धे व सहस्रबुद्धे परिवार आणि स्पाईस एन आईस इव्हेंट्स परिवाराला शुभेच्छा दिल्या. यामध्ये प्रामुख्याने यतीन शाह, सुहासिनी शाह, राम रेड्डी, व्यंकटेशला आर्काचे प्रमोद साठे, पवार साडी सेंटरचे गिरीश पवार, सेडा कमिटीचे अध्यक्ष ईश्वर मालू, सेडा कमिटीचे सदस्य सतीश मालू, शिवप्रकाश चव्हाण, सूर्यकांत कुलकर्णी, खुशाल देढीया, भूषण भुतडा, सुयोग कालाणी, विजय कस्ट्रक्शनचे विजय आकळवाडी, प्रसाद झुंजे, जे. जे. कस्ट्रक्शनचे जयदीप जानकर, HDFC बँकचे रिजनल मॅनेजर निकते, दिव्य मराठीचे युनिट हेड नौशाद शेख, शहाद आलीम, मुकुंद हिंगणे, प्रसाद गायकवाड, सिंहगड इंस्टीट्यूटचे नवले, अॅटलांसचे सुबोध भुतडा, प्रतिक भुतडा,रोहन भुतडा, स्टाईल मंत्राच्या सोनल पांचाळ, प्रशांत बडवे, रवि हलसगीकर, अमित कामतकर, रणजीत विश्वरुपे, न्यू राज ज्वेलर्स, धाराशिवचे सागर पंडित, अयोध्या ज्वेलर्स पंढरपूरचे श्रीपाद म्हंता, शिर्केज् स्पोर्ट्स पुणे येथीलसचिन शिर्के यांनी भेट दिली.
इव्हेंट्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी स्पाईस एन आईस इव्हेंट्स ने खूप कमी कालावधीत सोलापूरकरांची मने जिंकली आणि एक वेगळीच उंची गाठली आहे.
वाढदिवस, साखरपुडा, लग्न, मुंज, बारसे असे इव्हेंट्स असोत किंवा टेरी टॉवेल, इलेक्ट्रो यासारखी मोठी प्रदर्शने असोत उत्तम सेवा, बेस्ट क्वालिटी, वेळेचं नियोजन यामुळे स्पाईस एन आईस इव्हेंट्स नेहमीच लोकांच्या पसंतीस उतरते.
स्पाईस एन आईस चे नवीन ऑफीस 2350 स्क्वे. फुट मध्ये असून अतिशय वेगळ्या संकल्पनेवर आधारित असं हे ऑफीस आहे. स्टाफ साठी अत्यंत सुंदर बैठक व्यवस्था, सर्व सुखसोयी, मंद संगीत यामुळे खूप पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते.अनेक दिग्गजांंनी असं ऑफीस सोलापुरात कुठेच बघितलं नाही’ या शब्दात कौतुक केलं, सर्व व्हेंडर्स नी सुद्धा ऑफीस खूप आवडल्याचं आवर्जून सांगितलं. सोलापूरकरांनी एकदा आमच्या ऑफिस ला नक्की भेट द्यावी आणि ही आगळी वेगळी संकल्पना अवश्य पहावी असं आवाहन स्पाईस एन आईस इव्हेंट्स चे एम डी अनीश सहस्रबुद्धे यांनी केलं.