• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 20, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

राज्यात मविआच्या 16 सभा होणार, प्रकृती ठीक नसल्यानं काल नाना पटोले अनुपस्थित : संजय राऊत

by Yes News Marathi
April 3, 2023
in मुख्य बातमी
0
राज्यात मविआच्या 16 सभा होणार, प्रकृती ठीक नसल्यानं काल नाना पटोले अनुपस्थित : संजय राऊत
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रकृती ठीक नसल्यामुळं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहू शकले नाहीत. पण पुढील सभेला नाना पटोले उपस्थित राहतील असे खासदार संजय राऊत म्हणाले.
राज्यभरात महाविकास आघाडीच्या16 सभा होणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. काल छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली सभा ही उत्तम रितीनं पार पडली. या सभेला प्रकृती ठीक नसल्यामुळं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहू शकले नाहीत. पण पुढील सभेला नाना पटोले उपस्थित राहतील, अशी माहिती संजय राऊतांनी दिली.
गौतम अदानीचा मुद्दा अजिबात संपलेला नाही. कालच्या वज्रमूठ जाहीर सभेतही उद्धव ठाकरेंनी याच मुद्यावर भर दिल्याचे राभत म्हणाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये घटलेली घटना राष्ट्रवादीच्या एका नेत्याचे मुलानं घडवून आणल्याचा आरोप केला जात आहे. यावरही संजय राऊतांनी विचारण्यात आलं. त्यावेळी राऊत म्हणाले की, या देशात राड्याच्या घटना कोण घडवतय हे सर्वांना माहित आहे. काल हुबळीला दंगल कोणी घडवली? महाराष्ट्रात राडा कोण घडवत आहे? भाजपने राडा घडवण्याची विंग उघडल्याचे राऊत म्हणाले. 2024 पर्यंत हा देश दंगलीत होरपळू टाकायचा आणि मग निवडणुकांना सामोर जायचं हेच यांचे धोरण असल्याचे राऊत म्हणाले.
भाजपमधील अनेक नेत्यांची डिग्री बोगस, राऊतांचा आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पदवी विचारल्यावर यामध्ये लपवण्यासारखं काय? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. पंतप्रधान मोदी हे चहा विकून शिकले आहे. त्यातून त्यांनी बीए, एमए केलं आहे. नवीन संसदभवन बनवले आहे तिथे ती डिग्री लावावी असा टोलाही राऊतांनी लगावला. आमची डीग्री जनतेच्या समोर आहे. भाजपमधील अनेक नेत्यांची डिग्री बोगस असल्याचे राऊत म्हणाले.
महाराष्ट्रातील सरकार कमजोर
महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे गटाचं सरकार हे कमजोर आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा सुफडा साफ होईल असेही राऊत म्हणाले. जिथं जिथं भाजपला भीती वाटत आहे, तिथं तिथं राड्याच्या घटना घडच असल्याचे राऊत म्हणाले.
काल (3 एप्रिल) छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची जाहीर सभा झाली. सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक मंडळ मैदानवर ही सभा पार पडली. या सभेला महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र, काँग्रसचे नाना पटोले उपस्थित नव्हते. त्यामुळं राकीय वर्तलुळाच चर्चा सुरु झाली होती. मात्र, त्यांची प्रकृती ठिक नसल्यामुळं पटोले उपस्थित नसल्याचे राऊतांनी सांगितलं.

Previous Post

“मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा ग्रँड गाला: अमृता खानविलकरचा ब्लॅक अँड व्हाइट ड्रेसमध्ये मंत्रमुग्ध करणारा लुक”

Next Post

धास्ती वाढली; एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत कोरोना रुग्णसंख्या दुप्पट

Next Post
धास्ती वाढली; एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत कोरोना रुग्णसंख्या दुप्पट

धास्ती वाढली; एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत कोरोना रुग्णसंख्या दुप्पट

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group