माजी मंत्री आणि सध्याचे पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गिरीश बापट हे अनेक दिवसांपासून आजारी आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान बापट यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेतला होता.
दरम्यान, गिरीश बापटांच्या प्रकृतीबाबत अधिकची माहिती मिळू शकली नाही. पुण्यातील मंगेशकर रुग्णालयाकडून तासाभरात मेडिकल बुलेटिन जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर बापट यांच्या आरोग्याविषयी अधिकची माहिती मिळू शकेल.