सोलापूर – मोदी नावावर वक्तव्य केल्याबद्दल मोदी सरकारच्या दबावामुळे राहुल गांधी यांना सूरत कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा केली. याविरोधात सोलापुर शहर युवक कांग्रेसच्या वतीनेयुवक अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन सोलापुर येथे हुकुमशाही मोदींचा पुतळा दहन करण्यात आला. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरजोरात घोषणाबाजी केली.
यावेळी बोलताना गणेश डोंगरे म्हणाले, राहुल गांधी हुकूमशहाच्या विरोधात आवाज उठवत आहेत. अनेक मोदी नावाचे चोर देशाला लुबाडून पळून गेले त्याविरोधात चुकीला चुकीचे म्हणण्याचे धाडस दाखवत आहे. राहुल गांधी यांच्या आवाज दाबण्यासाठी हुकूमशहा मोदी सरकार कधी ईडी, कधी पोलिस, कधी केस, कधी शिक्षा देऊन धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. तरीही राहुल गांधी घाबरणार नाहीत यापुढेही हुकुमशाही विरोधात, महागाई विरोधात बेरोजगारी विरोधात, भ्र्ष्टाचार विरोधात विरोधात लढत राहणार, इंग्रजाविरुद्ध लढणाऱ्या शहीद भगतसिंग यांनी माफी मागितली नाही. त्यांच्याच पावलावर पाउल ठेउन हुकुमशाही मोदी सरकारची माफी कदापि राहुल गांधी मागणार नाहीत.
या आंदोलनात युवक काँग्रेस शहर अध्यक्ष गणेश डोंगरे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव प्रवीण जाधव, श्रीकांत वाडेकर, उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, माजी परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला, गणेश साळुंखे, महेंद्र शिंदे, शशिकांत शेळके, किरण राठोड, विवेक इंगळे,अशितोष वाले, गणेश वाघमारे व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.