चिंचवड आणि कसब पेठ पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. पहिल्या दिवसापासून वादात राहिलेल्या पोटनिवडणुकीत मतदार राजानं कोणाला कौल दिलाय हे स्पष्ट
कसबा मतदारसंघ हा भाजपचे वर्चस्व पाहायला मिळाले होते. मात्र, आता पोटनिवडणुकीत पारंपरिक मतदारसंघ राहिलेल्या पेठांनीच भाजपचं टेन्शन वाढवलं आहे. कारण कसबा पेठ, सदाशिव पेठ, सोमवार पेठ, शनिवार पेठ अशा विविध पेठांमध्ये भाजपचं मतदान घटलं आहे. त्यामुळे दहाव्या फेरीअखेर धंगेकरांचं मताधिक्य वाढतच चालले असून दुसरीकडे भाजपच्या गोटात काहीसं चिंतेचं वातावरण पसरले आहे.
कसबा पेठ आणि चिंचवड या दोन मतदारसंघात सुरु असलेल्या पोटनिवडणुकीसाठी आज (दि.२) मतमोजणी सुरु झाली आहे. चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल काटे, भाजपच्या अश्विनी जगताप आणि अपक्ष राहुल कलाटे या तीन उमेदवारांचे भवितव्य तिरंगी लढत होत आहे. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात भाजपचे हेमंत रासने रिंगणात आहेत.
कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.या चुरशीच्या निवडणुकीत भाजपकडून मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांसह जवळपास डझनभर मंत्री,नेते प्रचारात उतरवले होते. तर काँग्रेस व राष्ट्रवादीकडून देखील माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील कार्यकर्ते, नेत्यांची फौज उभी केली होती.मात्र, तरीदेखील भाजपचा बालेकिल्ला वा पारंपारिक मतदारसंघ राहिलेल्या पेठांमधील लोकांनी यो पोटनिवडणुकीत भाजपच्या हेमंत रासनेंऐवजी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्या पाठीशी असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.
पहिल्या फेरीपासून रवींद्र धंगेकर यांनी मतमोजणीत आघाडी राखली. ती सातत्याने कमी अधिक प्रमाणात राहिल्याचे पाहायला मिळाले. भाजपचा प्रभाव असलेल्या पेठांमधील फेरीत रासने ही पिछाडी भरुन काढतील असा अंदाज होता. मात्र, त्यात त्यांना अपयश आल्याचं समोर येत आहे. त्यामुळे धंगेकर यांनी दहाव्या फेरीअखेर तेरावी फेरीअखेर ५ हजारांवर मतांनी आघाडीवर आहेत.
तेराव्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांना ४९ हजार १२० तर हेमंत रासने यांना ४४.३४ मतं पडली आहेत. तर हिंदू महासंघाचे उमेदवार आनंद दवे यांना १२१ मते पडली आहेत.
कसबा , चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणीला सुरुवात झाली आहे. नवव्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याकडे ४५०६ मतांची आघाडी घेतली आहे. यात धंगेकर यांना ३४ हजार ७७८ मतं पडली आहेत. तर हेमंत रासने यांना ३० हजार २७२ मतं पडली आहेत.