सोलापूर महानगरपालिका अंतर्गत कार्यरत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसुतीगृहाचे नुतनीकरण बालाजी अमाईन्स, सोलापूर यांच्याकडून राम रेड्डी यांच्या पुढाकारातून बालाजी अमाईन्स यांचेकडील सीएसआर फंडामधून रक्कम रुपये 1.30 कोटी निधीतून नुतनीकरण करण्यात आलेल्या प्रसुतीगृहाचा शुभारंभ महानगरपालिकेच्या आयुक्त, सोमपा शीतल तेली-उगले यांच्या समक्षतेत पाच गर्भवती महिलांच्या शुभहस्ते दि. 24/02/2023 रोजी करण्यात आला असून सदर शुभारंभाचे वेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त (आरोग्य) विद्या पोळ, आरोग्याधिकारी डॉ. बसवराज लोहारे नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, राष्ट्रीय आरोग्य अभियानकडील शहर कार्यक्रम व्यवस्थापक, डॉ. अतिष बोराडे, शहर लेखा व्यवस्थापक, सिध्देश्वर बोरगे, डॉ. ज्ञानेश्वर सोडळ, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, अधिपरिचारिका यांच्या उपस्थितीत झाला. या शुभारंभ प्रसंगी बालाजी अमाईन्स, सोलापूर यांचेकडील संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजेश्वर रेड्डी, वास्तूविषारद मनोज मर्दा, तांत्रिक सल्लागार, मल्लिकार्जून बिराजदार, व इतर सर्व मनपा कर्मचारी व बालाजी अमांईन्सचे कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
बालाजी अमाईन्स यांचेकडील रक्कम रुपये 1.30 कोटी निधीतून प्रसुतीगृहाकरिता अद्ययावत व सुसज्य शस्त्रक्रिया गृह व शस्त्रक्रियेकरिता लागणारी सर्व अद्ययावत उपकरणे यामध्ये शस्त्रक्रिया टेबल 1, प्रसुती टेबल 2, ऑटोक्लेव्ह 1, शाडोलेस लॅम्प 1, स्क्रबर 4, गिजर 1 उपलब्ध करुन देण्यात आलेले असून याकरिता स्वतंत्र व सुसज्य प्रसुतीगृह, प्रसुत पश्चात नवजात शिशु करिता स्थिरीकरण कक्ष, जोखीमग्रस्त व अति गंतागुंतीच्या गरोदर मातांकरिता अतिदक्षता विभाग तसेच प्रसुतपूर्व तपासणीकरिता येणा-या गर्भवती मातांना सुसज्य प्रतिक्षालय तसेच प्रसुत पूर्व तपासण्या यामध्ये सोनोग्राफी, प्रयोगशाळा तपासण्या इ. उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. प्रसुतीगृहाकरिता 24 तास विद्युत सेवा उपलब्ध रहावी याकरिता स्वतंत्र डिझेल जनरेटर तसेच रुग्णांसाठी शुध्द पिण्याच्या पाण्याची, अंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था व रुग्णांना उद्वाहन (लिफट) सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सदर प्रसुतीगृहाचे नुतनीकरण व अद्ययावतीकरण करुन येथे 60 खाटा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. तसेच प्रसुती कक्षामध्ये 6 प्रसुती टेबल व षस्त्रक्रिया गृहामध्ये 2 शस्त्रक्रिया टेबल उपलब्ध करुन देण्यात आलेले असून येथे 3 स्त्रीरोग तज्ञ, 2 भूलतज्ञ व 1 बालरोग तज्ञ उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. या प्रसुतीगृहामध्ये महिलांकरिता व गरोदर मातांकरिता महिलांच्या आरोग्य विषयक सेवांची मोफत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच आज दि. 24 फेब्रुवारी 2023 रोजी 8 कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, 4 गर्भपाताच्या शस्त्रक्रिया व स्वाभाविक प्रसुती या रुग्णालयात झालेली आहे.
याच सोबत प्रसुतीगृहात दाखल होणा-या मातांना वरील सर्व सुविधा मोफत देण्यात येणार आहेत. प्रसुतीकरिता दाखल मातांना शासनाकडून मोफत आहार उपलब्ध करुन देण्यात येतो. याच बरोबर अनुसुचित जाती, जमाती व दारिद्रय रेषेखालील मातांना प्रसुती नंतर मोबदला अदा करण्यात येतो. प्रथम गर्भधारणा झाल्यानंतर पात्र लाभार्थी मांतांना प्रधांनमंत्री मातृवंदना योजने अंतर्गत र.रु. 5000/- इतका लाभ अदा करण्यात येतो.
या शुभारंभ प्रसंगी आयुक्त शीतल तेली-उगले यांनी नुतनीकरण व अद्ययावतीकरण करण्यात आलेल्या प्रसुतीगृहामध्ये महिलांच्या आरोग्य विषयक आजारांवर उत्तम दर्जाचे उपचार व त्याअंतर्गत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या असून याचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त षीतल तेली-उगले यांनी केले आहे.