No Result
View All Result
- सोलापूर – देशाचे प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतून जम्मू आणि काश्मीर येथे तिसऱ्या खेलो इंडिया हिवाळी स्पर्धेत श्रेया राजेश क्षीरसागर हिने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी डाॅ. सोनिया बागडे यांच्या हस्ते श्रेया हीचा गौरव करणेत आला.
विंटर गेम 2023 चे गुलमर्ग येथे 10 ते 14 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते, विंटर गेम आईस स्केटिंग बंनडी या गेममध्ये महाराष्ट्राने दुसरा क्रमांक मिळवला.
- कु. श्रेया राजेश क्षीरसागर ही जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षा श्रीमती सुरेखा जवळकर यांची कन्या आहे. केंद्रीय विद्यालय सोलापूर इयत्ता 8 वी हिला उत्कृष्ट खेळाबद्दल दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस सिल्वर मेडल मिळाल्याबददल महाराष्ट्र जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी महासंघातफे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सोनिया बागडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पवार, महासंघाच्या उपाध्यक्षा सुरेखा जवळकर, प्रमोदकुमार म्हमाणे , शर्मा उपस्थित होते.
No Result
View All Result