No Result
View All Result
ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, कोल्हापूर या संस्थेचा शिवजयंतीनिमित्त अनोखा उपक्रम
- ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, कोल्हापूरच्यावतीने सर्व पक्ष, मंडळे , संस्था , संघटना यांना असे आवाहन करण्यात आले आहे की, यावर्षी शिवजयंती वैचारिक पद्धतीने साजरी करूया. आता फक्त जय जयकार नको! छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार समजून घेऊन आत्मसात करूया !
- आज 350 वर्षांहून अधिक काळ लोटून गेला, तरीही सर्वसामान्य रयतेच्या मनामध्ये राजे अधिराज्य करीत आहेत. असं त्यांचं काय वेगळेपण होतं? की लोकशाहीमध्ये पण शिवाजी महाराजांचं कौतुक होतं. शहीद गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या 76 पानांच्या पुस्तकांमध्ये आपल्या राजाचं हे आपलंपण, वेगळेपण, 700 पानं लिहून पण जमणार नाही, इतक्या प्रभावीपणे मांडलं आहे. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये, असे सैन्याला सक्त आदेश देणारा राजा, रयतेची काळजी करणारा राजा. परस्त्रीला मातेसमान मानणारा राजा, सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन रयतेचं राज्य उभं करणारा राजा, अशा विविध अंगाने राजांची नव्याने खरी ओळख संदर्भासहित करुन देणारे शिवाजी कोण होता ? या पुस्तकाच्या किमान 111 प्रती वाटून या अभियानात सहभागी होण्याचा आव्हान करण्यात येत आहे. त्यासोबतच “शिवाजी कोण होता” पुस्तकाच्या 111 प्रती फक्त 2000 रुपयांमध्ये उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
- तसेच पुस्तकांसाठी 8421229935 / 9172484942 या नम्बरवर संपर्क करण्याचे आव्हान संस्थेतर्फे करण्यात येत आहे.
No Result
View All Result