एस न्युज मराठी नेटवर्क : अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला ही केवळ अफवा आहे. त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही. उद्या ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतील अशी माहिती, शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली. माझं आणि सत्तार यांचं बोलणं झालं आहे. त्यांची आता कोणत्याही प्रकारची नाराजी नाही, असंही त्यांनी नमूद केलं.
माझं आणि सत्तारांचं बोलण झालं आहे. त्यांनी राजीनामा दिला या केवळ अफवा आहेत. त्यांची कोणतीही नाराजी आता नाही. त्यामुळे आता हा विषय संपला आहे, असं खोतकर म्हणाले. सत्तार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. ते उद्या दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्र्यांची मातोश्री येथे भेट घेणार आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताचं मी खंडन करतो. उद्या ते सर्व विषयांवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करतील, असंही ते म्हणाले.