सोलापूर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून दक्षिण तालुक्यातील विविध 7 रस्त्यांसाठी 20 कोटी 35 लाखांचा निधी मंजूर झाला आहॆ. याबाबत आमदार सुभाष देशमुख यांनी पाठपुरावा केला होता. अखेर त्याला यश आले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना संशोधन व विकास अंतर्गत आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राज्य निधी अंतर्गत हा निधी मंजूर झाला आहॆ.
कुमठे ते कुलकर्णी तांडा साडेतीन किलोमीटर रस्त्यासाठी दोन कोटी 60 लाख, विंचूर ते अंत्रोळी साडेचार किमी रस्त्यासाठी तीन कोटी 30 लाख, भंडारकवठे ते विंचूर तांडा साडेपाच किलोमीटर रस्त्यासाठी तीन कोटी 75 लाख, कुसूर तेलगाव रस्ता ते कोळी वस्ती तीन किमी रस्त्यासाठी दोन कोटी 25 लाख, डोणगाव ते पाथरी पाच किमी रस्त्यासाठी तीन कोटी 75 लाख, तसेच सिंदखेड ते आहेरवाडी साडेचार किमी रस्त्यासाठी तीन कोटी 50 लाख तर विंचूर ते वडापूर या दीड किलोमीटर रस्त्यासाठी एक कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.निधी दिल्याबद्दल आमदार देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
दक्षिण मधील रस्त्यासाठी आणखी निधी आणणार: आ. देशमुख
ग्रामीण भागातील रस्ते झाल्यावर दळणवळणाची चांगली सोय होणार आहे. सध्या दुसऱ्या टप्प्यातून 20 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. दक्षिण तालुक्यातील आणखी काही रस्त्यांसाठी आपण शासनाकडे पाठपुरावाकडून निधी खेचून आणू ,असे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.