अशी चर्चा जेव्हा कुठेही सुरू असते, तेव्हा उर भरून येतं.
शिवसेनेत बाळासाहेबांबरोबर असल्यापासून एकनाथजी शिंदे यांनी काम केलं आहे. लोकांशी अधिकाधिक संपर्क करत असताना काळ, वेळ कशाच भान त्यांना राहत नाही. लोकांसाठी वाहून घेणं काय असतं! हे एकनाथजी शिंदे यांच्याकडे पाहिल्यानंतर समजून येईल. यासारख्या अनेक कारणामुळे एकनाथजी शिंदे यांच्या संपर्कात आपण शिवसेनेत आल्यापासून आहोत. त्यातच युवा सेनेच जिल्हाप्रमुख पद असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नामदार तानाजी सावंत यांनी आशीर्वाद दिले . मग ना.एकनाथजी शिंदे यांच्याकडेही अनेकदा त्यांच्या माध्यमातून आपण जनतेचे प्रश्न घेऊन जाऊ लागलो. एकनाथजी शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्याबरोबर कोण? पुढे भवितव्य काय? असे प्रश्न विचारले जातहोते. त्या वातावरणात मी मनीष काळजे एकनाथजी शिंदे जिथे, तिथे जाणार असे सांगितले. त्यावेळी एकनाथजी शिंदे मंत्री होतील काय? मुख्यमंत्री होतील काय? हा विचारही कोणासमोर नव्हता. यामुळे त्यांच्या राजकीय पदाचा फायदा डोळ्यासमोर ठेवून आपण त्यांच्याबरोबर आलो नाही तर त्यांच्या जनसेवेचा वसा त्यांच्याच आशीर्वादाने पुढे न्यावा या दृष्टीने शिंदेंच्या बरोबर जाण्याची घोषणा केली. आणि यानंतर माझं कार्य मानणारे एकनाथजी शिंदे यांना मानणारे अनेक जण सोलापुरात एकनाथजी शिंदे यांच्या पाठीशी उभे राहू लागले. देखते देखते कारवा बनता गया!
जनतेचे काम करत असताना तहान भूक विसरून काम करावं लागतं. लोकांना चमकोगिरी आणि प्रत्यक्ष काम यातील फरक लक्षात येतो. म्हणूनच की काय पक्ष नेतृत्वाने बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद आपल्याकडे दिल आणि ही जबाबदारी ही आपण जोमानं पार पाडतो आहोत . एकनाथ शिंदे असो तानाजी सावंत असो या नेत्यांचे फोन येतात आणि कार्याचं कौतुक करतात, यासारखा आनंद नसतो. आज राज्यासाठी अहोरात्र कार्य करत असलेल्या एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवस आहे. आई तुळजाभवानी, विठोबा रुक्माई आणि अक्कलकोट स्वामी चरणी प्रार्थना आहे अशा नेत्याच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळाली त्यांचं आरोग्य चांगलं ठेव. हीच प्रार्थना आणि सदिच्छाही आहेत .माझ्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी पहिल्याच दौऱ्यात मुख्यमंत्री आवर्जून आले, कार्यकर्त्यांना मोठं करणे, संधी देणं त्यांनी आणलेली काम आपुलकीने ऐकून घेणं, जिथे शक्य आहे तिथे काम तत्काळ करण्याचे आदेश देणे . ही एकनाथजी शिंदे यांची कार्यपद्धती चांगली आहे आणि ज्या कामांमध्ये अधिकाधिक जनहित आहे त्या कामाची तातडीने कार्यवाही होईल या दृष्टीनेही एकनाथजी शिंदे सतत प्रयत्नशील असतात. त्यांचा हा गुणच त्यांच्याकडे तळमळीच्या कार्यकर्त्यांना आक्रुष्ट करतो असं माझं मत आहे. शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंदजी दिघे यांच्या मार्गदर्शनात तयार झालेले एकनाथ शिंदे महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभले .त्यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राची चौफेर प्रगती होत आहे. अनेक उद्योग, व्यवसाय महाराष्ट्रात यावेत यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या कार्याला यश येवो याच वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.
आज माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची सोलापूर शहर जिल्ह्यात पत निर्माण झाली आहे. लोक हक्काने शासकीय कार्यालयात जातात त्याप्रमाणे आमच्या कार्यालयात येऊन अडचणी सांगतात . मनीष तुमचं कार्यालय म्हणजे सोलापूरचे सीएमओ कार्यालयात आहे असं हक्काने म्हणतात, या अडचणी आम्ही सोडवून घेऊन त्यांना न्याय मिळवून देतो, यासारखं कार्याचे समाधान नाही. लोकांचा विश्वास सार्थ करणे हेच कार्यकर्त्याचं काम असतं आणि हीच शिकवण एकनाथजी शिंदे या राजकीय गुरूंना आम्हाला दिली आहे