शाळांनी सहभागी होण्याचे आवाहन
श्री छत्रपति शिवाजी महाराज स्मारक मंडळ शिवस्मारक तर्फे बुधवारी रोजी सकाळी ७ वाजता शिंदे चौकातील शिवस्मारक पटांगणात सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
संगीत सूर्यनमस्कार या प्रकारात ही स्पर्धा होणार असून शालेय व खुल्या गटात ही स्पर्धा घेतली जाणार आहे. सूर्यनमस्कार १० अंकात घालावयाचे आहेत. या स्पर्धेत शाळा, क्रीडा मंडळ, संस्था यासारखे कोणतेही गट सहभागी होऊ शकतात. सूर्यनमस्कार घालण्याच्या सरावाकरिता शिवस्मारकतर्फे ध्वनीफित दिली जाणार असून यातील संगीताच्या तालावर सूर्यनमस्कार घालायचे आहेत.
एका संघात कमीत कमी २० आणि जास्तीत जास्त ५० स्पर्धकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. विजेत्या संघांना पारितोषिक मिळणार असून सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेकरिता सोमवारी दि. १३ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत शिवस्मारक कार्यालयात नोंदणी करावी. स्पर्धकांची नाव नोंदणी शाळेच्या अधिकृत पत्रावर संबंधित शिक्षकाच्या सहीने असणे आवश्यक आहे. विजेत्या पहिल्या तीन संघांना अनुक्रमे पाच हजार तीन हजार आणि दोन हजार तसेच स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिक देण्यात येणार आहे.
स्पर्धकांना देण्यात येणाऱ्या ध्वनिफितीसाठी शिवस्मारकचे व्यवस्थापक मल्लिनाथ व्हटकर यांच्याशी ९८२२४९८३७३ किंवा शैलेश कुलकर्णी यांच्याशी ९०२२५७५५९१ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी याप्रसंगी केले.
या पत्रकार परिषदेस शिवस्मारकचे सचिव गंगाधर गवसने, कोषाध्यक्ष धनंजय कुलकर्णी आदी उपस्थित हो