आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावरून शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट
ठाकरे गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान औरंगाबादमध्ये येथे त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तर विधान परिषदेचे पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा हल्ला शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा गंभीर आऱोप केला आहे. आता यानंतर आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
औरंगाबादमधील महालगाव येथे आमदार आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रेचा कार्यक्रम आणि रमाबाई आंबेडकर यांची मिरवणूक एकाचवेळी सुरु झाली होती. रमाईंची मिरवणूक थांबवल्यानं आदित्य ठाकरेंच्या गाडी अडवण्यात आली. तसेच त्यांच्या ताफ्यावर दगडफेक देखील करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळं काही वेळ तिथं तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. डीजे बंद केल्याच्या रागातून हा तणाव निर्माण झाला होता. यानंतर त्यांनी थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं आहे.
पोलीस महासंचालकांना पत्र..
आदित्य ठाकरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून शिवसैनिकां(Shivsena)मध्ये संतापाची लाट आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना ठाकरेंच्या गाडीवरील हल्लानंतर पत्र पाठवलं आहे. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत गाफीलपणा केल्याचा ठपका यात ठेवला आहे.तसेच याबाबत एसपी, आयजींशी बोलले स्थानिक पोलिसांवर ते कारवाई करतील अशी अपेक्षाही दानवेंनी यावेळी व्यक्त केली आहे.
अंबादास दानवे यांच्या पत्राची शिंदे फडणवीस सरकारकडून दखल घेण्यात आली आहे. आता आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान स्थानिक पोलिसांचा अतिरिक्त ताफा सुरक्षेसाठी तैनात राहील अशी माहिती देण्यात आली आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आदित्य ठाकरे यांच्या हल्ल्यानंतर शिंदे गटावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. दानवे यांनी टि्वटद्वारे शिंदे फडणवीस सरकारवरही निशाणा साधला आहे.
दानवे म्हणाले, आदित्य ठाकरेंच्या सभेत अडथळे निर्माण करत दोन समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न महालगाव (ता. वैजापूर) येथील सभेदरम्यान झाला. सरकारचे देखील आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे.
सदर गोंधळ घालणारे मिंधे गटाचे आमदार रमेश बोरणारे(Ramesh Bornare)यांच्या नावाच्या घोषणा देत होते. आदित्य ठाकरेंच्या सुरकक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि पोलीस अधिक्षकांवर कारवाई झालीच पाहिजे.