No Result
View All Result
जागृत पालक सुदृढ बालक अभियानाचा सिध्देवाडीत शुंभारंभ
- सोलापूर – जिल्हात तीन लाख बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. जागृत पालक सुदृढ बालक अभियान प्रभावीपणे राबवा असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
- पंढरपूर तालुक्यांतील सिध्देवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबीरात आज जागृत पालक सुदृढ बालक अभियानाचा शुभारंभ आज सिईओ दिलीप स्वामी यांचे हस्ते करणेत आला. आज अंगणवाडी व प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेतील मुलांची आरोग्य तपासणी करणेत आली. या कार्यक्रमास जि प सदस्य वसंतराव देशमुख, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, बाल विकास प्रकल्प अधिकारी अमृत सरडे , वैद्यकीय अधिकारी डाॅ. एकनाथ बोधले, वैद्यकीय अधिकारी शुभांगी गुंजाळ ,सरपंच. रोहिणी सारंग जाधव, विठ्ठलचे संचालक दशरथ जाधव, दिपक भालेकर, प्रगतशाल बागायतदार बालाजी जाधव, सदस्य रमेश बनसोडे, आप्पा जाधव , संतोष जाधव प्रमुख उपस्थित होते.
सोलापूर जिल्हयात अंगणवाडीतील ३ लाख बालके व प्राथमिक शाळेतील किमान चार लाख बालकांची आरोग्य तपासणी करणेत येणार आहे.
या प्रसंगी बोलताना सिईओ स्वामी म्हणाले, जिल्ह्यात जागृत पालक व सुदृढ बालक अभ्यास राबविणेत्त येत आहे. दि, ९ फेब्रुवारी पासून याची जिल्हयात अभियानाची अंमलबजावणी करणेत येणार आहे. श्रम संस्कारामुळे युवकांवर चांगले संस्कार होतात. या शिबीरामुळे युवकांचा व्यक्तीमत्व विकास होणेस मदत होणार आहे. या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी शुभांगी गुंजाळ, दत्तात्रय येडवे व संजय बिदरकर , कोरोना काळात उत्कृष्ठ काम केलेबद्दल सरपंच रोहिणी सारंग जाधव तसेच , विलास भोसले सरकोली , कार्यक्रम अधिकारी चौधरी, तसेच आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेती पुजा दिगंबर घुले या युवतीचा नागपूर येथे सेपतटकरा या प्रकारामध्ये सुवर्णपदक मिळालेबद्दल सिईओ दिलीप स्वामी यांचे यांचे हस्ते सत्कार करणेत आला. या प्रसंगी सिध्देवाडी येथील मातांचा सत्कार आंबेचे रोप देऊन सिईओ स्वामी यांनी केला. सिईओ स्वामी यांचा सत्कार सारंग जाधव यांचे हस्ते करणेत आला.
- या प्रसंगी अंगणवाडी सैनिकांनी “बेटी बचाओ बेटी पढाओ” यावर पथनाट्य सादर केले. या प्रसंगी ‘बेबीकेअर किट’ चे वाटप सिईओ स्वामी यांचे हस्ते करणेत आले. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी आभार मानले.
No Result
View All Result