No Result
View All Result
- राज्यातील जिल्हा परिषदा, नगरपरिषदा, नगरपालिका, कटकमंडळे, महानगरपालिका तसेच मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक शाळांमध्ये माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षण सेवकांना त्यांचे शैक्षणिक अर्हता व पदास अनुसरुन रुपये ३०००/- ते रुपये ५०००/- पर्यंत मानधन दिले जात होते. तद्नंतर राज्यातील शिक्षण सेवकांना मिळणारे मानधन दिनांक १७.०९.२०११ रोजीच्या त्यांचे शैक्षणिक अर्हता व पदास अनुसरुन रुपये ६,०००/- ते ९०००/- निश्चित करण्यात आले. या मानधनामध्ये अद्यापपर्यंत वाढ करण्यात आलेली नाही. दरम्यानच्या कालावधीत वाढती महागाई, राज्य स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक महाविद्यालयातील नियमित शिक्षकांना ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारीत वेतनश्रेणी लागू झाली असल्यामुळे शिक्षण सेवक यांच्या मानधनात वाढ करणे आवश्यक आहे. तसेच शिक्षण सेवकांचे मानधनात वाढ करावी, या मागण्यांच्या अनुषंगाने अनेक निवेदने शासनास प्राप्त झाली आहेत.
- मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र. १३६७/२०२२ मध्ये, दिनांक ३०.०६.२०२२ रोजी, शिक्षण सेवकांना देण्यात येणारे मानधन कमीत कमी कोणत्याही प्रकारच्या उद्योगातील वर्ग शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२०/प्र.क्र.२६०/ टिएनटि-१ ४ च्या कर्मचान्यास देय किमान वेतनाएवढे सुधारीत करण्यात यावे. तसेच मानधनाचे निश्चित दर चार वर्षातून किमान एकदा सुधारीत करण्यात यावेत. शिक्षण सेवकांना रुपये १५,०००/- ते रुपये २०,०००/- दरम्यान मानधन अदा करण्यात यावे, असे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील दि. २२.०९.२०२२ रोजी बैठक पार पडली असून, सदर बैठकीत शिक्षण सेवकांची मानधनवाढ निश्चित करण्यात आली असून, त्यास मा. मंत्रीमंडळाच्या बैठकीत सादर करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मा. न्यायालयाचे उक्त आदेश व शिक्षण सेवकांच्या मानधनात बऱ्याच कालावधीपासून न झालेली वाढ यास्तव मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
- शासन निर्णयः
मंत्रीमंडळाने दिनांक २२.१२.२०२२ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक. उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय विद्यालयातील शिक्षण सेवकांचे मानधनात वाढ करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांचे मानधनात पुढीलप्रमाणे वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे: प्राथमिक व उच्च प्राथमिक रु. १६,०००/-, माध्यमिक रु.१८,०००/-, उच्च माध्यमिक बी कनिष्ठ महाविद्यालय रु. २०,०००/- शिक्षण सेवकांना मानधनातील वाढ ही १ जानेवारी २०२३ पासून लागू करण्यात आल्याचे पत्र संदर्भ क्र. १०६६/व्यय ५ दि. ०७.११. २०२२ अन्वये निगर्मित करन्यात येत आहे.
No Result
View All Result