पाकिस्तानने भारतीय विमानाला हवाई क्षेत्र नाकारल्याने तुर्कीसाठी मदत घेऊन निघालेल्या विमानाला वळसा घालावा लागला
तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपामुळे मोठं संकट कोसळलं आहे. या संकट काळाता एकीकडे भारतासह जगभरातीली अनेक देश मदतीसाठी पुढे येत असताना पाकिस्ताननं पुन्हा एकदा नाक खुपसलं आहे. पाकिस्तानने हेकेखोरी दाखवत तुर्कीसाठी मदत घेऊन जाणाऱ्या भारतीय विमानांना हवाई हद्दीत प्रवेश नाकारला आहे. यामुळे भारतीय विमानाला वळसा घालून तुर्कीमध्ये प्रवेश करावा लागला.
भारतीय विमानांना हवाई हद्दीत प्रवेश नाकारला
तुर्कीमध्ये आलेल्या भूकंपामुळे तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाचे 40 हून अधिक धक्के बसले. यामुळे, तेथील हजारो घरे आणि इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. ढिगाऱ्याखाली अडकून सुमारे 4000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले असून त्यांना वाचवण्यासाठी मदत आणि बचावकार्य सुरु आहे. मात्र हवामान बदलामुळे यामध्ये अडथळे येत आहेत.