भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज टी20 मालिकेतील दुसरा सामना लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
भारत आणि न्यूझीलंडयांच्यात टी20 मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने 12 धावांनी जिंकला आहे. त्यामुळे मालिकेत त्यांनी 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ज्यामुळे आजचा सामना भारताने गमावल्यास मालिकाही भारत गमावेल. आज होणारा दुसरा टी20 सामना लखनौच्या श्री अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. तर भारतासाठी करो या मरो चा हा सामना आहे,
लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. या क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. येथे प्रत्येक वेळी प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. हे सर्व विजय काहीसे एकतर्फी झाले आहेत. अशा परिस्थितीत या स्टेडियममध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला अधिक मदत मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, रात्री दुसऱ्या डावात दव फॅक्टर गोलंदाजांना त्रास देऊ शकतो अशा स्थितीत नाणेफेक जिंकल्यानंतर कोणताही निर्णय घेणे कर्णधारासाठी सोपे नसेल.
न्यूझीलंडविरुद्ध भारताचा टी20 संघ
हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उप कर्णधार), इशान किशन (विकेटकिपर), शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकिपर) , वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार