सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे प्रभाग 26 मधील अनेक नगरांमध्ये ड्रेनेज, पाण्याची पाईपलाईन, अंतर्गत रस्ते, दिवाबत्ती इ. समस्यांसाठी निवेदन देण्यात आले होते. त्याची दखल घेत आ. सुभाष देशमुख यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून दहा कोटी मंजूर करून आणले आहेत. त्यापैकी प्रभाग 26 साठी 3 कोटी 48 लाख रुपये मंजूर झाले व तसे पत्र प्राप्त झाले त्यामुळे प्रभाग 26 चा कायापालट होणार आहे. त्यामध्ये ज्या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन व ड्रेनेज लाईन झालेली आहे तेथे रस्ते कामाची सुरुवात जलद गतीने होणार आहे. असा विश्वास राजश्री चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
खालील नगरात रस्ते कामास सुरुवात होणार आहे ;
द्वारका नगर बस स्टॉप ते शाम धूरी घरापर्यंत रस्ता करणे.
राघवेंद्र नगर चव्हाण घर ते महेश बोरगावकर घर रस्ता करणे.
राघवेंद्र नगर बिराजदार घर ते कापसे घरपर्यंत रस्ता करणे.
उद्धव नगर येथील प्रीती बस स्टॉप ते उद्धव नगर कडे जाणारा रस्ता करणे.
गुरुदेव दत्त नगर भाग 2 येथील अंतर्गत रस्ते करणे.
सवेरा नगर येथील बडुरे घर ते खिलारे घर पर्यंत रस्ता करणे.
सवेरा नगर येथील चिंचोळकर घर ते लाईने घर पर्यंत रस्ता करणे.
रेणुका नगर येथील अंतर्गत रस्ते करणे.
कोळी समाज सोसायटी येथील अंतर्गत रस्ते करणे.
चिदंबरम नगर येथील राजमाने घर ते कुलकर्णी घर पर्यंत रस्ता करणे.
कल्याण नगर भाग 1 विशाल नाईकवाडी घर ते पंडित अंबारे घर पर्यंत रस्ता करणे.
स्वामी समर्थ नगर सोसा. एसआरपी कॅम्प जवळ प्लॉट नंबर 210 ते प्लॉट नंबर 259 पर्यंत रस्ता करणे.
स्वामी समर्थ सोसा. एस आर पी कॅम्प जवळ गेट न.2 ते गावकरे घरापर्यंत रस्ता करणे.
समर्थ सोसा. एस आर पी कॅम्प जवळील गेट 1 ते निळ घरापर्यंत रस्ता करणे.
समर्थ सोसायटी एस आर पी कॅम्प जवळ नीळ घर ते गावकरे घरापर्यंत रस्ता करणे.
समर्थ सोसायटी एसआरपी कॅम्प जवळ बागल घर ते माने घरापर्यंत रस्ता करणे.
भाग्यलक्ष्मी पार्क येथे रावसाहेब घर ते आनंद पाटील घर ते मंगल विहार पर्यंत रस्ता करणे.
चंडक मळा परिसरात अंतर्गत रस्ते करणे.
राम नारायण चंडक विहार येथे अंतर्गत रस्ते करणे.
विश्व नगर येथील अंतर्गत रस्ते करणे.
गुरुदेव दत्त नगर मधील महालक्ष्मी नगर ते रेणुका मंगल कार्यालय पर्यंत रस्ता करणे.
अभिषेक नगर येथील अंतर्गत रस्ते करणे.
वरील नगरांचा सर्वे झाला असून लवकरच रस्ते कामाची सुरुवात होणार आहे.