मध्य प्रदेशातील मोरेनाजवळ सुखोई-30 आणि मिराज 2000 अशी दोन विमाने कोसळली आहेत. शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर हवाई तळावरून उड्डाण केले होते. जिथे सराव सुरू होता. दुसरीकडे, प्राथमिक माहितीनुसार राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी चार्टर्ड विमान कोसळले. जिल्हाधिकारी अशोक रंजन यांनी दुजोरा दिला आहे. पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती अजून मिळालेली नाही.
भरतपूरच्या उचैन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे विमान हवाई दलाचे आहे की लष्कराचे हे अद्याप निश्चित झालेले नाही. दुसरीकडे भरतपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्याम सिंह यांनी सांगितले की, सध्या हे लहान विमान असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अजून स्पष्टता नाही. त्याचा आकाशातच स्फोट झाला होता. कोणाचा मृत्यू झाला आहे की नाही याची संपूर्ण चौकशी सुरू आहे.